...म्हणून नासाने महिलांचे ऐतिहासिक स्पेसवॉक केले रद्द
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने काही दिवसांसाठी महिलांचे स्पेसवॉक रद्द केले आहे.
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने काही दिवसांसाठी महिलांचे स्पेसवॉक रद्द केले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील क्रूच्या सदस्यांच्या मापाचे स्पेससूट उपलब्ध नसल्यामुळे स्पेसवॉक रद्द करण्यात आले आहे. अशी माहिती अमेरिकन स्पेस एजन्सीने दिली आहे. नासाच्या अंतराळवीर ऍनी मॅकक्लेन आणि क्रिस्टीना कोच यांना 29 मार्च रोजी स्पेसवॉक करायचे होते. या महिला अंतराळवीरांना केंद्राच्या एका सौर संरचनेवर शक्तिशाली लिथियम-आयन बॅटरी लावण्यासाठी स्पेसवॉक करायचे होते.
अंतराळ केंद्र 1998 मध्ये तयार झाल्यापासून आतापर्यंत एकूण 214 स्पेसवॉक झाले आहेत. या प्रत्येक स्पेसवॉकमध्ये किमान एक पुरूष असणे गरजेचे असते. 22 मार्च रोजी मॅकक्लेनने आपले पहिले स्पेसवॉक केले होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांना मध्यम आकाराच्या स्पससूटची गरज आहे. नासाच्या माहितीनुसार फक्त एक स्पेससूट तयार करण्यात येणार आहे. ते स्पससूट कोच घालणार आहे.
मॅकक्लेन अता आठ एप्रिलला स्पेसवॉक करणार आहे. या स्पेकवॉक दरम्यान त्यांच्यासोबत कॅनेडियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर डेव्हिड सेंट जॅक असतील.