ताऱ्यांचं बेट! नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपनं टिपलं अंतराळातील विहंगम दृश्य, पाहा Photo
NASA`s James Webb Telescope: रात्रीच्या वेळेस मोकळ्या अवकाशाकडे डोकं वरून करून पाहिलं तर असंख्य तारे, चांदण्यानं आभाळ भरलेलं दिसतं. लहानग्यांना ताऱ्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल असतं. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था असलेली नासा अंतराळातील अद्भुत जगाचा अभ्यास करते. संशोधनातून या जगातील नवनव्या गोष्टी समोर आणत असतं. आता नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनं `पिलर्स ऑफ क्रिएशन`नं एक जबरदस्त फोटो टिपला आहे.
NASA's James Webb Telescope: रात्रीच्या वेळेस मोकळ्या अवकाशाकडे डोकं वरून करून पाहिलं तर असंख्य तारे, चांदण्यानं आभाळ भरलेलं दिसतं. लहानग्यांना ताऱ्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल असतं. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था असलेली नासा अंतराळातील अद्भुत जगाचा अभ्यास करते. संशोधनातून या जगातील नवनव्या गोष्टी समोर आणत असतं. आता नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनं 'पिलर्स ऑफ क्रिएशन'नं एक जबरदस्त फोटो टिपला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर ताऱ्याचं जग अद्भुत असल्याची प्रचिती येते. अनंत ब्रह्मांडाचा हा एक छोटासा भाग आहे. 'पिलर्स ऑफ क्रिएशन' पृथ्वीपासून 6,500 प्रकाशवर्षांच्या अंतरावर आपल्या आकाशगंगेच्या ईगल नेब्युलामध्ये स्थित आहेत. या फोटोंमध्ये गॅस आणि धुळीच्या दाटीवाटीत नवे तारे तयार होताना दिसत आहेत. त्रिमितीय खांब मोठ्या खडकांसारखे दिसतात. हे खांब थंड आंतरतारकीय वायू आणि धूळ यांचे बनलेले आहेत, असं नासानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. खांब कधीकधी जवळ-अवरक्त प्रकाशात अर्ध-पारदर्शक दिसतात.
टेलिस्कोपने टिपलेल्या फोटोत हजारो तारे चमकताना दिसत आहेत. एक वेगळीच प्रतिमा दिसत आहे. ब्रह्मांडातील कॅनव्हॉस किती विशाल आहे? विचार करण्यापलीकडे आहे. लखलखणारे तारे सोनं, तांबे आणि तपकिरी रंगात प्रकाशित होत आहे. काही टोकांना चमकदार लाल, लावासारखे ठिपके दिसत आहेत. नासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "हे ताऱ्यांचं बेट तयार होत असल्याने उत्सर्जन होत आहेत." तारे एकमेकांवर आदळल्याने एक उर्जा तयार होते आणि त्यामुळे एक अद्भुत नजारा दिसतो.
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपची क्षमता
यापूर्वी हबल स्पेस दुर्बिणीने 1995 आणि 2014 मध्ये असे फोटो टिपले होते. परंतु एका वर्षापूर्वी अंतराळात प्रक्षेपित केलेल्या नवीन जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या इन्फ्रारेड क्षमतेमुळे, स्तंभांच्या अस्पष्टतेतून अनेक नवीन तारे तयार होताना दिसतात.