NASA Moon Mission : ओ आओ तुम्हे चाँद पे ले जाएं प्यार भरे सपने सजाएं छोटा सा बंगला बनाएं एक नयी दुनिया बसाए...  गीतकाराच्या कल्पना विश्वातील हे गाण प्रत्यक्षात साकारमा आहे. कारण अमेरिकेची आंतराळ संस्था NASA खरोखरंच चंद्रावर घर बांधणार आहे. आपल्या मून मिशन अंतर्गत नासाने चंद्रावर  मानवासाठी घर बांधण्याचा प्लॅव तयार केला आहे. 2040 पर्यंत चंद्रावर मानवी वस्ती विकसीत करण्याचे ध्येय नासाने विश्चित केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

50 वर्षांपूर्वी नासाच्या अपोलो मिशनअंतर्गत मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. यानंतर आता नासाने थेट चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले आहे.  'नासा'नं मून मिशन 'आर्टेमिस'ची तयारी करत आहे. 'आर्टेमिस' मोहिमेअंतर्गत चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याची नासाची योजना आहे. 2040 पर्यंत नासा चंद्रावर घर बांधणार आहे. 


बांधकाम तंत्रज्ञान कंपनीसोबत पार्टनशिप 


चंद्रावर मानवासाठी घरं बांधण्याचा NASA चा प्लॅन रेडी आहे. यासाठी बांधकाम तंत्रज्ञान कंपनीसोबत पार्टनशिप देखील करण्यात आली आहे.  टेक्सास येथील ICON या  बांधकाम तंत्रज्ञान कंपनीसोबत ही पार्टनशिप करण्यात आली आहे. नासाने ICON कंपनीला निधी देखील उपलब्ध करुन दिला आहे. कंपनी सध्या चंद्रावर घरांचे बांधकाम करण्यासाठी असलेले तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी संशोधन करत आहे. 


3D प्रिंटरच्या मदतीने चंद्रावर घर बांधणार 


चंंद्रावर तापमान कसे आहे? चंद्राववरीची जमीन नेमकी कशी आहे? येथे घरांची निर्मीती करण्यासाठी काय करता येईल यावर संशोधन सुरु आहे. या संशोधनात संशोधकांना मोठे यश मिळाले आहे. चंद्रावरील धूळ ही मानवाच्या शरीरासाठी अत्यंत धोकायदायक असल्याचे देखील संशोधनात समोर आले आहे. मात्र, यापासून मानवाचा कशा प्रकारे बचाव करता येईल यावर देखील संशोधन सुरु आहे. ज्या प्रमाणे पृथ्वीवर येथील माती तसेच खनिजांचा वापर करुन घरांची निर्मिती केली जाते त्याप्रमाणे चंद्रावर घरांची निर्मीती करताना चंद्राच्या पृष्ठभागावरील माती तसेच खनिजांचा वापर केला जाणार आहे. 3D प्रिंटरच्या मदतीने चंद्रावर घर बांधली जाणार आहेत. चंद्रावरील धूळ, माती तसेच दगड यांचा वापर करुन येथे इमारती बांधण्याची योजना आहे. 


काय आहे नासाचे 'आर्टेमिस' मिशन


2024 मध्ये नासाचं एक पथक आर्टेमिस मोहिमेअंतर्गत चंद्रावर स्थायी बांधकामासाठी जागा शोधण्याकरता जाणार आहे. अमेरिकेच्या 50 वर्षांपूर्वीच्या अपोलो मिशननंतर प्रथमच अंतराळवीरांना चंद्रावर नेण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.जर हे मिशन यशस्वी झाले तर, 2025 पर्यंत अंतराळवीर चंद्रावर पाठवले जातील. आर्टेमिस-1 मोहिमेनंतरच नासाचे शास्त्रज्ञ चंद्रावर पोहोचण्यासाठी इतर आवश्यक तंत्रे विकसित करतील.