नासाच्या अंतराळवीरांची पायवारी `येथे` पाहा लाईव्ह
एकिकडे भारताच्या चांद्रयानाची मोहिम अतिशय महत्त्वाच्या टप्प्यात असतानाच....
मुंबई : एकिकडे भारताच्या चांद्रयानाची मोहिम अतिशय महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचली आहे, तर दुसरीकडे नासाकडून एक अनोखी मोहिम साऱ्या जगाला पाहण्याची संधी मिळत आहे. नासाचे दोन अंतराळवीर आज तब्बल सहा तास स्पेस वॉक करणार आहेत.
स्पेस वॉक, म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस सेंटरमधून दोन अंतराळवीर बाहेर पडतील आणि सहा तास ते अंतराळात चालणार आहेत. आज सकाळी ८ वाजून २० मिनिटांपासून सुरु झालेला हा प्रोग नासाच्या संकेतस्थळावर लाईव्ह दाखवला जाणार आहे.
लाईव्ह स्पेस वॉक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
१६ ऑगस्टला नासाकडून या प्रयोगाचा सराव करण्यात आला होता. या संपूर्ण प्रयोगादरम्यान संकेतस्थळावरून तज्ज्ञ याचं धावतं समालोचनही करणार आहेत. Nick Hague आणि Andrew Morgan हे दोन अंतराळवीर स्पेस सेंटरमधून बाहेर पडतील, अशी माहिती नासाकडूनच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका ब्लॉगमध्ये देण्यात आली होती.