न्यूयॉर्क : नासा ही अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था कायमच वेगवेगळ्या सॅटेलाईटच्या माध्यमातून जगातील विविध नैसर्गिक घटनांवर नजर ठेऊन असते.  आता नासाच्या सॅटेलाइटने एक इमेज पोस्ट केली आहे. त्यात दक्षिण आशियातील सर्वात प्राणघातक पावसाची माहिती दिली आहे.  भारताच्या उत्तर भागात, बांग्लादेश आणि नेपाळ या ठिकाणी झालेल्या प्राणघातक अतिवृष्टीमुळे २५० नागरिकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढंच काय तर दक्षिण एशियामध्ये अतिवृष्टाचा पाऊस होणं ही अगदी सामान्य बाब होती. मात्र यंदा पडलेला हा पाऊस सामान्यापेक्षा अधिक असल्याचं सांगितलं गेलं. या प्रकारामुळे यंदा भूस्खलन आणि पुराच्या परिस्थितीमध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आणि आता झालेला जास्त पाऊस हा ब्रम्हपुत्रा आणि गंगा नदीच्या ठिकाणी त्रास देत आहे.


नासामार्फत हा पाऊस मोजण्यासाठी IMERG चा वापर केला जातो. यामध्ये दक्षिण एशियाचा सर्व रिअल टाइम डाटा उपलब्ध होतो. यामध्ये आता १० ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०१७ पर्यंतची माहिती देण्यात आली आहे. गेल्या सात दिवसाच्या पावसाची नोंद ही ३०० मिमी म्हणजे ११.८ इंच इतकी झाली आहे.  या पावसाची नोंद ही नेपाळ, बांग्लादेश या परिसरातील झाली आहे. त्याचप्रमाणे IMERG च्या माहितीनुसार, सर्वाधिक पाऊस म्हणजे अगदी १००० मिमी म्हणजे ३९.४ इंच इतकी पावसाची नोंद ही बांग्लादेशच्या उत्तर भागात झालेली आहे.