व्हिडिओ : कारमधील स्टंट बेतला महिलेच्या जीवावर
चालत्या कारमध्ये अर्धनग्न अवस्थेत मस्ती करणे एका महिलेच्या चांगलेच अंगाशी आले. ही महिला कारमधून प्रवास करताना अंगावरची वस्त्रे काढून स्वत:ला खिडीकीबाहेर झोकून देत होती. हा प्रकार करत असताना रस्त्याकडील खांबाशी धडक बसून तिला आपला जीव गमवावा लागला.
मॉस्को : चालत्या कारमध्ये अर्धनग्न अवस्थेत मस्ती करणे एका महिलेच्या चांगलेच अंगाशी आले. ही महिला कारमधून प्रवास करताना अंगावरची वस्त्रे काढून स्वत:ला खिडीकीबाहेर झोकून देत होती. हा प्रकार करत असताना रस्त्याकडील खांबाशी धडक बसून तिला आपला जीव गमवावा लागला.
या तरूणीच्या या धक्कादायक कृत्याचा व्हिडिओ शोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ही महिला रशियातील मॉस्को येथील रहिवाशी आहे. डोमिनिक रिपलब्लिकची सुट्टी साजरी करण्यासाठी ती घराबाहेर पडली होती. प्राप्त माहितीनुसार ही महिला कारमध्ये हा प्रकार करत असताना तिच्यासोबत एक मित्रही होता. अंगात केवळ बिकीनी बॉटम घातलेली ही महिला पूर्णपणे अर्धनग्न होती. आणि ती कारच्या खिडकीतून सतत बाहेर झोकावत होती. दरम्यान, कारमध्ये असलेला तिचा सहकारी तिच्या या ओंगळवाण्या प्रकाराचे व्हिडिओ शुटींग करत होता.
या महिलेची मस्ती आणि त्याचे तिच्या सहकाऱ्याकडून केले जाणारे शुटींग हा प्रकार बराच वेळ सुरू होता. दरम्यान, कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला घासून गेली. यात ही महिला त्या खांबाला धडकली. या प्रकारानंतर तिला हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळू शकले नाही. तिचा मृत्यू झाला.
केवळ २२ सेंकंदाचा असललेल्या या व्हिडिओत या महिलेला आलेल मृत्यू किती भयानक होता, हे समजू शकते. ही महिला कारच्या पूढच्या सीटवर असल्याचे दिसते. जिथून ती स्वत:ला कारबाहेर झोकाऊन देत होती. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार नतालिया बोरिसोवना असे या महिलेचे नाव असून, ती ३५ वर्षांची होती. ही घटना घडली तेव्हा इवाना बोइराचुक नावाचा मित्र तिच्यासोबत होता. बोइराचुक हा नतालियाच्या मस्तिचे शुटींग करत होता.