नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबई हल्ल्यावर मोठा खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, 2008 मध्ये मुंबईमध्ये झालेल्य़ा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता. याआधी भारताच्या या दाव्यावर पाकिस्तानच्या सरकारने नकार दिला होता. पण आता नवाज शरीफ यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत मुंबई हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका असल्याची गोष्ट नाकारली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाज शरीफ यांनी म्हटलं की, 'पाकिस्तानमध्ये 3 सरकारं चालत आहेत. या वेळी पाकिस्तानमध्ये अनेक दहशवादी संघटना सक्रीय आहेत. पाकिस्तामधील वृत्तपत्र डॉनला दिलेल्या एका मुलाखतीत नवाज शरीफ यांनी म्हटलं की, 'ज्या दहशवादी संघटना सक्रिय आहेत काय त्यांना आपण सीमेपलीकडे आणि मुंबईमध्ये 150 लोकांची हत्या करण्याची परवानगी दिली पाहिजे.' रावळपिंडी दहशतवादी विरोधी न्यायालयाताली मुंबई हल्ल्यातील ट्रायल लांबत असतांना त्यावर बोलताना नवाज शरीफ यांनी म्हटलं कीस 'आपण सुनावणी पूर्ण का केली नाही.' 


नवाज शरीफ यांना पनामा पेपर प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मागील वर्षी 28 जुलैला दोषी ठरवलं होतं. यानंतर त्यांना पंतप्रधानपद सोडावं लागलं होतं.