Red Meat allergy:  अमेरिकेत सध्या एका विचित्र आजारामुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत. एक विशिष्ट प्रकारचा किडा चावल्यामुळे हा आजार होतोय. या आजाराची लक्षण ही एलर्जीसारखी आहेत. म्हणजे ठाराविक पदार्थ खाल्ल्यावरच एलर्जी होत आहे. सुरुवातीला प्राथमिक लक्षणे दिसतात. मात्र, अचानक एलर्जीचा त्रास वाढतो आणि व्यक्तीला रुग्णालायता दाखल करण्याची वेळ येते.  अमेरिकेपाठोपाठ भारतीयांना देखील या विचित्र धोका निर्माण झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणता किडा चावल्यानंतर होतोय हा आजार?


स्टार टिक नावाचा किडा चावल्यामुळे हा आजार होतोय. स्टार टिक या किड्याला वैज्ञानिक भाषेत  एम्ब्लिओमा एमेरिकानम असे म्हणतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या किड्यामध्ये विशिष्ट प्रकारचे रसायन असते. अल्फा गॅल नावाचे हे रसायन असते. जेव्हा हा किडा माणसाला चावतो तेव्हा हे रसायन मानवाच्या शरीरात पसरते. 


एलर्जी कशी होते?


हा किडा चावल्यानंतर मानवाला लगेच त्रास होत नाही. मात्र, हा किडा चावल्यानंतर रेड मीट अर्थता वशिष्ट प्रकारचे मांस खाल्ल्यानंतर याचा त्रास सुरु होतो. कारण  स्टार टिक किड्यामध्ये असलेले  अल्फा गॅल नावाचे हे रसायन रेड मीट मध्ये देखील असते. यामुळे हा किडा चावल्यानंतर रेड मीटचे सेवन केल्यास किड्याने दंश केल्याने शरीरात गेलेल्या अल्फा गॅल आणि रेड मीड मध्ये असलेले अल्फा गॅल यांचे मिश्रण होवून एलर्जी होते.


भारतीयांना का आहे या आजाराचा धोका?


अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये या किड्याची उत्पती अधिक प्रमाणात होते. भारतात हा किडा क्वचित आढळतो. मात्र, तरीही देखील भारतीयांनी  खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत एपिडेमियोलॉजिस्ट डॉ जुगल किशोर यांनी सांगितले. हा आजार गंभीर नसला तरी याचा त्रास अचानक वाढतो. यामुळे वेळीच या आजाराची लक्षणे ओळळून उपचार घेणे गरजेचे आहे. 


या आजाराची लक्षणे काय आहेत


या आजाराचे प्राथमिक लक्षण म्हणजे शरीराला  खाज सुटते. सतत ओटीपोटीत दुखते. वारंवार शिंका येतात.  नाकातून सतत पाणी येवून नाक वाहत राहते. 


या आजारापासून बचाव कसा कराल?


हा किडा चावल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. वेळीच लक्षणे ओळखून योग्य उपचार घ्या. गवत आणि झाडे असलेल्या भागात अनवाणी चालणे टाळा कारण, हे किडे झाडा झुडपांमध्ये मोठ्या प्रमाणाता आढळतात.  घराभोवतीचा परिसर स्वच्छता ठेवा. घरी कीटकनाशक वापरा. बाहेर फिरताना पूर्ण बाही असलेले कपडे घाला.