काठमांडू : आशिया खंडात आपलं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला नेपाळ सारख्या छोट्या देशाने चांगलाच धक्का दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळने चीनच्या एका कंपनीला दिलेला हायड्रो प्रोजेक्टचा करार रद्द केला आहे. नेपाळचे उपपंतप्रधान कमल थापा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.


उपपंतप्रधान कमल थापा यांनी ट्विट केले की, संसदीय समितीच्या निर्देशानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चीनी कंपनी गजबू ग्रुपशी करार रद्द करण्यात आला आहे. अनियमिततांशी संबंधित तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.


चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचं म्हटलं आहे. नेपाळच्या ओबोरमध्ये सामील होण्यास तयार झाल्यानंतरच हा करार झाला होता. त्यामुळे नेपाळ सरकारची ही भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.


सुमारे एक वर्षापूर्वी, गजुबा वॉटर अँण्ड पॉवर कंपनी लिमिटेडने या चिनी कंपनीने नेपाळचकडून हा प्रकल्प विकत घेतला होता. या प्रकल्पाअंतर्गत, नेपाळमधील मध्य व पश्चिम भागात पाणी साठवण धरणे बांधण्यात येणार होती.