Corona New Variant : कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे संपलेला नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) भीती व्यक्त होत असतानाच आता कोरोनाचा नवा विषाणू (COVID19 Variant) आढळल्याने चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेत हा विषाणू आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार मल्टिपल म्युटेशनसह हा नवा विषाणू आढळून आला आहे. WHO च्या युरोप कार्यालयाने, पुढील काही दिवसांत कोविड-19 मुळे मृत्यूची प्रकरणे वाढण्याची भीती व्यक्त केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवा व्हेरिएंटमुळे इतके बाधित
नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजने दिलेल्या माहितीनुसार, वैज्ञानिक या नवीन कोरोना व्हेरिएंटचे संभाव्य परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जीनोमिक सिक्वेन्सिंगनंतर, असे आढळून आले आहे की आतापर्यंत B 1.1.529 व्हेरिएंटची 22 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. याआधीही दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचे काही व्हेरिएंट आढळून आले होते. गेल्या वर्षी, दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा कोरोनाचा बीटा व्हेरिएंट  आढळला होता. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हेरिएंट C.1.2 आढळला होता.


53 देशात धोक्याची घंटा
दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अंदाज वर्तवला होता की हिवांळ्यात 53 देशांमध्ये, कोरोना व्हायरस साथीच्या रोगामुळे (Coronavirus) आणखी 7 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे WHO ने सतर्क केलं असून कमी प्रतिकारशक्ती असलेल्या आणि 60 वर्षांवरच्या नागरिकांना तसंच आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्यास प्राधान्य दिलं पाहिजे, असं म्हटलं आहे. 


WHO चा खबरदारीचा इशारा
डब्ल्यूएचओने लोकांना खबरदारीचा इशारा दिला असून कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. युरोप आणि मध्य आशियामध्ये कोविड-19 ची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हिवाळ्यात आणखी प्रकरणं वाढू शकतात, त्यामुळे योग्य खबरदारी घेणं गरजेचं आहे.