मुंबई : कधी अपेक्षाही केलं नसेल असं काही सरप्राईज आपल्याला मिळालं तर आनंद गगनात मावेनासा होतो. असंच काहीस ख्रिसमसच्या दिवशी घडलं आहे. एका व्यक्तीला अनपेक्षितपणे करोडो रुपयांची लॉटरीच जणू लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहणारे हेरॉल्ड एम यांना ख्रिसमसच्या दिवशी अनोखं गिफ्ट मिळालं आहे. 70 वर्षांचे हेरॉल्ड ख्रिसमसची शॉपिंग करायला गेले होते. 


शॉपिंग करून झाल्यावर एका हॉटेलमधील स्पा आणि कसीनोमध्ये हेरॉल्ड गेले. तेथे ख्रिसमसच्या निमित्ताने पोकरचा शो सुरू होता. नशीब साथ देते का बघूया म्हणत त्यांनी तो खेळ खेळायचा ठरवला. आणि हेरॉल्ड यांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच पोकरची पैज लावली. 


5 डॉलर म्हणजे जवळपास 350 रुपयांची पैज लावली 


हेरॉल्ड यांनी थ्री कार्ड पोकर टेबलवर बसण्याचा निर्णय घेतला. 6 कार्डची बोनस पैज लावली. बघता बघता हेरॉल्ड जवळपास 7 करोड रुपयांची पैज जिंकले. 


15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच झालं असं 


बोर्गोटा हॉटेल आणि कसीनोच्या माहितीनुसार 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांद असं झालं आहे. एका व्यक्तीने पहिल्यांदा एवढी मोठी रक्कम जिंकली आहे. 


एवढंच नव्हे तर कसीनोने ट्विट करून हेरॉल्ड यांनी एवढी मोठी रक्कम जिंकल्याची माहिती दिली आहे. हेरॉल्ड आपल्या आयुष्यात दोनदा कॅन्सरशी झगडले आहेत.