लंडन : प्रथम ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाचा नवा विषाणूचा (New Strain Covid) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा (Coronavirus) नवीन स्ट्रेन जगातील १६ देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात कोरोना व्हायरसचे संकट निवळतय नं निवळतय तोच कोरोना व्हायरसमध्ये बदल होऊन नवीन स्ट्रेनचा प्रसार होऊ लागला आहे. 


ब्रिटनमध्ये तीन नवे कोरोना व्हायरस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमध्ये या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले. ब्रिटनमध्ये तीन नवे कोरोना व्हायरस सापडलेत. या प्रकारचा व्हायरसचा प्रसार वेगाने होत असल्याची माहिती समोर आली. तसेच तो अत्यंत घातक असल्याने चिंतेत भर पडली आहे. नवा स्ट्रेन सापडल्यानंतर चिंता व्यक्त होत होती. त्यात अधिक भर पडलेली दिसून येत आहे. 


कोरोना स्ट्रेनचे दोन नवे विषाणू सापडल्यामुळे सर्वांच्या चिंतेत वाढ होते तोच कोरोनाचा आणखी दुसरा प्रकारही ब्रिटनमध्ये आढळून आला. अखेर त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तोपर्यंत नव्या स्ट्रेनचा हा व्हायरस जगातील १६ देशांमध्ये पोहोचला आहे. 


या देशांत कोरोनाचा नवा स्ट्रेन पोहोचला


ब्रिटनसह स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झरलंड, डेन्मार्क, नेदरलँड्स, जर्मनी या देशात पोहोचलाय. नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण सप्टेंबरमध्ये आढळून आला होता. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी डिसेंबरमध्ये ब्रिटनध्ये लॉकडाऊन घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर ब्रिटनहून विविध देशांत गेलेल्या अनेकांना या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले. आफ्रिकेतून प्रवास करुन आलेल्या प्रवाशांतून हा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका या देशातील विमान सेवा बंद करण्यात आली आहे.