नवा व्हेरिएंट : संकटाची चाहूल; अमेरिकेत आणीबाणीसह नवीन निर्बंध, लॉकडाऊनची भीती
Corona New Variant : कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. आता जगावर पु्न्हा नवा व्हेरिएंटचे संकट घोंगावत आहे.
वॉशिंग्टन : Corona New Variant : कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. आता जगावर पु्न्हा नवा व्हेरिएंटचे संकट घोंगावत आहे. अमेरिकेत (America) या नव्या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये, याची खबरदारी म्हणून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी नवीन प्रवास निर्बंध जारी केले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. नव्या व्हेरियंटचं नाव ओमिक्रॉन (Omicrone) असून या व्हेरियंटमुळे जगभरात पुन्हा लॉकडाऊनची भीती व्यक्त होत आहे.
नवा व्हेरिएंटचा धोका असल्याने न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. नव्या Omicrone व्हेरिएंटची दहशत निर्माण झाली आहे. या नव्या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी शुक्रवारी नवीन प्रवास निर्बंध लादले आहेत. (New York declares 'State of Emergency' amid spike in Covid-19 infections)
दरम्यान, न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी काल राज्यातील कोविड -19 रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या धोक्यामुळे आणीबाणी जाहीर केली आहे. त्या म्हणाल्या की राज्यात या व्हेरिएंटचा अद्याप सापडलेला नाही. मात्र, खबरदारी घेण्यात येत आहे. आरोग्य विभागाला रुग्णालयांमध्ये गरजेच्या नसलेल्या तसेच अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रियांसह इतर उपचारांवर मर्यादा घालण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या साधनांचा साठा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नवीन आदेश डिसेंबरपासून जानेवारीपर्यंत लागू असणार आहे. कारण हिवाळ्यात रुग्णसंख्या उच्चांक गाठेल, अशी शक्यता लक्षात घेऊन हा इशारा देणारा देण्यात आला आहे. न्यूयॉर्क राज्यात नवीन ओमिक्रॉन प्रकार अद्याप सापडला नसला तरी तो येण्याची शक्यता आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काल दक्षिण आफ्रिकेतील राष्ट्रांवर नवीन प्रवास निर्बंध लादले आहेत. आफ्रिकेत जेथे ओमिक्रॉन प्रकार प्रथम आढळला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अमेरिकेत आतापर्यंत कोणतेही ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळलेले नाहीत.