वेलिंग्टन : दैनंदिन जीवनात अनेकदा असे काही प्रसंग ओढावतात जेव्हा त्या प्रसंगांना तोंड देत असताना गोष्टी सवयीच्या होऊन जातात. या प्रक्रियेत काहींचा आत्मविश्वास वाढतो, तर काही मंडळी व्यक्ती म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने घडतात. साऱ्या जगासमोर गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वागण्याबोलण्याने असाच आदर्श प्रस्थापित केला आहे, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या त्या सोशल मीडियावर चर्चेत आहे ते म्हणजे भूकंपामुळे. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या एका मुलाखतीदरम्यान, भूकंप आलेला असताना त्यावर जेसिंडा यांची प्रतिक्रिया अनेकांनाच आश्चर्यचकित करुन गेली. 


न्यजहबचे सूत्रसंचालक रायन ब्रिज यांना मध्येच थांबवत त्यांनी वेलिंग्टनच्या परिसरात काय होत होतं याविषयी सांगितलं. 'रायन, इथे भूकंप येत आहे. थोडासा हादरा बसत आहे', आपल्या आजूबाजूला पाहत पंतप्रधानांचे हे उदगार अनेकांच्या भुवया उंचावून गेले. सूत्रसंचालकांना आपण असणाऱ्या खोलीमधील वस्तू हलताना दिसत असल्याचं सांगणाऱ्या या पंतप्रधानांचा व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत होत आहे. 


न्यूझीलंड हा देश पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर स्थि आहे. त्यामुळं केव्हा केव्हा इथे येणाऱ्या भूकंपांना शेईक आईल्स म्हणूनही संबोधलं जातं. अमेराकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या भूगर्भशास्त्र अहवालानुसार सोमवारी पॅसिफिक महासागरात ५.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला होता. वेलिंग्टनपासून हे ठिकाण जवळपास १०० किलोमीटरच्या अंतरावर होतं. 



सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास देशातील अनेक नागरिकांना भूकंपाचा हादरा जाणवला. हा हादरा इतका ताकदीचा होता की, मांडणीतील समानही खाली पडलं. दरम्यान, मुलाखतीदरम्यानच भूकंप अल्यामुळे त्याविषयी माहिती देत तो थांबल्यानंतरही जेसिंडा यांनी वृत्तनिवेदकांना याबाबत सूचित केल्याचं पाहायला मिळालं.