Trending News : आपण सोशल मीडियावर बुलेटीन करणारे अँकर आणि रिपोर्टरसोबत घडलेले अनेक मजेदार किस्से पाहिले असाल. हे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिले जातात. अनेक वेळा लाईव्ह सुरु असताना अचानक मुलं कॅमेरासमोर आल्यामुळे झालेली फजिती. तर कधी कधी लाईव्ह बुलेटीन सुरु असताना अँकरला रडू कोसळलं. असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. 'द शो मस्ट गो ऑन' असंच काहीसी या अँकरसोबत झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका लाईव्ह न्यूज अँकरसोबत बुलेटीन सुरु असताना जे काही घडलं ते पाहून तुम्ही अवाक व्हाल. लाईव्ह बुलेटीन सुरू असताना अचानक अँकरच्या नाकातून रक्त यायला लागलं. त्यानंतरही या अँकरने आपलं बुलेटीन सुरु ठेवले. हळुहळु त्याचा नाकातील रक्त तोंडात जायला लागलं तरीही या अँकरने अतिशय धैर्याने बुलेटीन सुरु ठेवलं.  


 


ही घटना पाहून दर्शकांनी या अँकरसाठी काळजी व्यक्त केली आहे. तर ''त्याने नाकातून रक्त येत असतानाही लाईव्ह शो का सुरु ठेवला?'' असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर काही लोकांचं म्हणं आहे की, ''त्याला कामावरुन काढून टाकण्याची भीती होती म्हणून त्या अँकरने लाईव्ह शो सुरु ठेवला.''  ज्यावेळी या अँकरच्या नाकातून रक्त येऊ लागलं तरी त्याने अँकरिंग सुरु ठेवलं. याप्रसंगी स्टुडियामध्ये त्याचासोबत अजून एक महिला अँकर होती. तिने या अँकरला बातमी वाचण्यात मदत केली. ही घटना चीनमधील असून त्या अँकरचं नाव हुआंग शिनकी आहे.



या घटनेनंतर अनेकांनी या अँकरचं कौतुक केलं आहे. तर काही यूजर्सने ''त्याचे काम वाखडण्याजोगे आहे'' असं म्हटलं आहे. तर काही यूजर्सने म्हटलं आहे की ''जर त्या स्टुडिओमध्ये सहकारी अँकर होती तर तिच्याकडे कॅमेरा का वळवला गेला नाही?''