Niger News: जगाच्या पाठीवर घडणाऱ्या अनेक घटना प्रत्यत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपात आपल्या आयुष्यावरही परिणाम करत असतात. अशीच एक घटना सध्या संपूर्ण जगाचीच चिंता वाढवताना दिसत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे देशातील सत्तापालट आणि एकंदर माजलेली धुमश्चक्री. जिथं काल- परवापर्यंत या देशाचं नाव फार कुठंही दिसलं नाही, तिथंच आता मात्र हा देश जागतिक राजकारणावर परिणाम करताना दिसत आहेत. या देशाचं नाव आहे नाइजर. आफ्रिेतील या राष्ट्रामध्ये लष्करानं सत्तापालट केलं असून, राष्ट्रीय वाहिनीवरून त्यासंदर्भातील अधिकृत घोषणासुद्धा केली. यावेळी नाइजरच्या संविधानाला रद्दबातल ठरवत शासकीय संस्था आणि योगनाही विसर्जित करण्यात आल्या. लागलीच देशाच्या सीमाही बंद करण्याता निर्णय घेण्यात आला आणि संपूर्ण जगाच्या नजरा नाइजरकडे वळल्या. 


सत्तापालट होण्याची ही पहिली वेळ नाही 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाइजरमध्ये सत्तापालट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा 1960 मध्ये फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळआल्यानंतर या देशात जवळपास चार वेळा सत्तापालट झाला होता. असं असलं तरीही सध्याच्या परिस्थितीचे थेट परिणाम पाहता अमेरिका आणि आफ्रिकन संघराज्याच्या अडचणी वाढल्याचं स्पष्ट होत आहे. 


हेसुद्धा वाचा : 'मी परत येईन..' म्हणत अर्ध्या रात्री घर सोडून गेली मुलगी, तब्बल 4 वर्षांनी आई-बाबांनी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसेना


जगातील सर्वाधिक युरेनियम उत्पादक देश 


जगभरात सर्वाधिक प्रमाणात युरेनियम निर्मात्या देशांमध्ये नाइजर आघाडीच्या नावांपैकी एक असून, जागतिक अणू संघ (डब्ल्यूएनए)नुसार जगातील सातव्या क्रमांकाचा युरेनियम उत्पादक देश मानला जातो. अणूबॉम्ब, अणूउर्जा या आणि अशा इतर गोष्टींमध्ये वापरल्या जाणाऱ्या युरेनियमचे मोठे साठे असणाऱ्या या लहानशा देशावर अमेरिकेसह जगातील इतरही राष्ट्रांची नजर आहे. इथं मिळणाऱ्या युरेनियमचा वापर लष्करी अवजारं, स्फोटकं, वैद्यकिय उपकरणांमध्येही केला जातो. बरं हे युरेनियम इतकं घातक की, एका क्षणात सर्वकाही उध्वस्त करण्याची क्षमता असते. पण, आता मात्र देशाची सूत्र लष्कराच्या हाती गेल्यामुळं नवी आव्हानं निर्माण होण्याची चिन्हं आहेत. 


दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी नाइजरचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बजौम यांची ताबडतोब सुटका करण्यासोबतच देशात लोकशाहीवर आधारित कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्यासंबंधीचं आवाहन केलं. जगातील सर्वाधिक गरीब राष्ट्रांच्या यादीत येणाऱ्या या देशानं अमेरिकेच्या चिंतेत भर घातली. जवळपास 80 ट्क्क्यांहून अधिक भागात वाळवंट असणाऱ्या या देशातील सत्तापालटामुळं अमेरिकेच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यातच या देशावर असणारा कर्जाचा बोजा पाहता येणारी परिस्थिती आणखी बिकट होणार हे आता जवळपास सिद्धच होत आहे.