काय सांगता? इटलीत तीन महिन्यांपासून एकही बाळ जन्माला आलं नाही! धक्कादायक आहे कारण
World News : जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडी अनेकदा आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सध्या इटली या देशातील परिस्थितीसुद्धा असंच काहीसं करताना दिसतेय.
World News : जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं भेट देण्याची अनेकांचीच इच्छा असते. असे अनेक देश असतात ज्या देशांमध्ये असणारी ठिकाणं, तेथील भौगोलिक रचना आणि तेथील हवामान कायमच पर्यटकांमध्ये (Travel News) चर्चेचा विषय ठरतं. अशाच देशांमधील एक म्हणजे इटली. इटलीची खाद्यसंस्कृती (Italian Food), तेथील राहणीमान या आणि अशा तत्सम कारणांनी इथं कायमच मोठ्या संख्येनं पर्यटक भेट देत असतात. पण, हाच देश सध्या मात्र एका वेगळ्या कारणामुळं जगाची चिंता वाढवताना दिसत आहे.
इटलीमध्ये जन्मदर घटला (Birth Rate)
जगावर एकामागून एक संकटं ओढावताना दिसत आहेत. त्यातलंच एक संकट म्हणजे संपूर्ण जगाचं वाढतं वय. वाचूनही आश्चर्य वाटेल, पण या जगाचं वय वाढत असल्यामुळं जपान आणि चीनसारख्या देशांवरही संकट ओढावलं आहे. या यादीत इटलीचाही समावेश होताना दिसतोय. कारण, येथील जन्मदर मोठ्या प्रमाणात घटला आहे. हे संकट इतक्या गंभीर वळणावर पोहोचलंय की, इटलीच्या पंतप्रधानांकडून या परिस्थितीकडे राष्ट्रीय आपत्ती म्हणून पाहिलं जात आहे.
'मीडियम'च्या वृत्तानुसार मागील काही दिवसांमध्ये इटलीनं एक असा विक्रम रचला आहे, ज्यामुळं चिंतेत भर पडताना दिसत आहे. जागतिक स्तरावरील अहवालानुसार इटलीमध्ये मागील तीन महिन्यांमध्ये एकाही बाळाचा जन्म झालेला नाही. नॅशनल स्टॅटि्क्स ब्युरोच्या आकडेवारीचा हवाला देत रॉयटर्सनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार इटलीमध्ये जानेवारी 2023 ते जून 2023 पर्यंत याच काळात 2022 च्या तुलनेत मुलांचा जन्म झाला याच 3500 नं घट नोंदवण्यात आली होती.
हेसुद्धा वाचा : पॉर्न आपल्या आयुष्याच एक भाग...; 'खजुराहो', 'कामसूत्रा'ची उदाहरणं देत मोठ्या दिग्दर्शकाचं स्पष्ट मत
इटलीवर ओढावलेली ही परिस्थिती इतक्या बिकट वळणावर पोहोचली आहे की पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही यामध्ये लक्ष घालत त्याकडे राष्ट्रीय आपत्तीच्या दृष्टीनं पाहिलं. आपल्या निवडणूक प्रचारामध्येही त्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. इटलीमध्ये परिस्थिती इतकी भीषण आहे, की मागील वर्षभरात इथं दर सात मुलांमागे 12 जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास इथं एका दिवशी सात मुलांचा जन्म झाला होता तर, दुसरीकडे 12 नागरिकांचा मृत्यूही होत होता. हेच चक्र इथं सुरु राहिलं तर, इटलीची लोकसंख्या अतिशय झपाट्यानं कमी होईल अशीच भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ISTATच्या आकडेवारीनुसार इटलीमध्ये महिलांना पहिली पुत्रप्राप्ती वयाच्या 31 व्य वर्षी होते. मागील वर्षी अविवाहित महिलांच्या पोटी जन्मलेल्या बाळांच्या जन्माचा आकडा 41.5 टक्के इतका होता.