पॉर्न आपल्या आयुष्याच एक भाग...; 'खजुराहो', 'कामसूत्रा'ची उदाहरणं देत मोठ्या दिग्दर्शकाचं स्पष्ट मत

Vishal Bhardwaj on Porn : काही विषय इतके संवेदनशील होते की त्या विषयांना हाताळताना कलाकारांचं कौशल्यही पणाला लागलं.   

Oct 27, 2023, 14:33 PM IST

Vishal Bhardwaj on Porn : हिंदी कलाजगतामध्ये आजवर चित्रपटांच्या माध्यमातून अनेक विषय हाताळले गेले. 

 

1/7

संवेदनशील विषय

Bollywood director Vishal Bhardwaj on porn and films

Vishal Bhardwaj on Porn : याच संवेदनशील विषयांना तितक्याच शिताफीनं हाताळण्याचं काम मात्र काही अशा कलकारांनी केलं की प्रेक्षकांनीही या कलाकारांना उचलून धरलं. अशाच कलाकारांमधील एक नाव म्हणजे, विशाल भारद्वाज.   

2/7

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक

Bollywood director Vishal Bhardwaj on porn and films

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अशी ओळख असणाऱ्या विशाल भारद्वाज यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बऱ्याच प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली.   

3/7

पॉर्न फिल्म्स

Bollywood director Vishal Bhardwaj on porn and films

असाच एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला. हा प्रश्न होता पॉर्न फिल्म्स विषयीचा. 'पॉर्न तर आपल्या आयुष्याचाच एक भाग आहे. आपण सर्वांनीच आयुष्याच्या कोणत्या न कोणत्या टप्प्यावर पॉर्न पाहिली आहे', असं ते म्हणाले. 

4/7

मी खोटं बोलतोय...

Bollywood director Vishal Bhardwaj on porn and films

'आपण कधीच पॉर्न पाहिली नाही, असं म्हटल्यास मी खोटं बोलतोय हे सहज कळेल. ज्या देशात कामसूत्र लिहिण्यात आलंय, जिथं खजुराहोची मंदिरं आहेत तिथं पॉर्नबद्दल काहीही विचारायला शरम कसली', असं म्हणत त्यांनी आपला विचार मांडला.   

5/7

पॉर्न आणि तत्सम विषय

Bollywood director Vishal Bhardwaj on porn and films

पॉर्न आणि तत्सम विषयांकडे एका दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं. खजुराहोचं मंदिर का तयार करण्यात आलं आहे हे आपण जाणून घेतलं, त्यामागचा आध्यात्मिक दृष्टीकोन पाहिला तर अनेक गोष्टी उलगडतात असंही त्यांनी सांगितलं. 

6/7

खजुराहोची शिल्प

Bollywood director Vishal Bhardwaj on porn and films

खजुराहोची शिल्प आपल्याला अंतर्बाह्य विचार करायला सांगता, बाहेरच्या भींती ओलांडून तुम्हाला आतमध्ये जावं लागतं, थोडक्यात तुम्हाला स्वत:चाच शोध घ्यावा लागतो. हा त्यामागचा सखोल अर्थ आहे.   

7/7

संदर्भ चुकीचाही असू शकतो

Bollywood director Vishal Bhardwaj on porn and films

'ती मंदिरं तोडण्यात आली, तोडायला सांगण्यात आली. माझ्या वाचनानुसार गांधींना ती मंदिरं रुचली नव्हती', असं म्हणताना त्यांनी आपल्या वाचनात आलेला संदर्भ चुकीचाही असू शकतो म्हणत वक्तव्याला आधार दिला.