मुंबई : कोणत्याही गोष्टीसाठी फॉर्म भरणे हे खूपच कंटाळवाणं आणि कठीण काम आहे. लोकांना ते करायला अजिबात आवडत नाही. एवढंच नाहीतर फॉर्ममध्ये असलेले कठीण शब्द हे लोकांच्या विचाराच्या पलिकडचे असतात. ज्यामुळे लोकांना तो फॉर्म भरताना शब्द सुचत नाही किंवा ते कळत देखील नाही. त्यात फॉर्ममध्ये खाडाखोड चालत नाही, ज्यामुळे खूपच काळजी घ्यावी लागते. परंतु एका विद्यार्थांसोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. जिथे फॉर्ममध्ये मोबाईल नंबर विचारला गेला होता, तिथे या विद्यार्थ्याने काही भलतंच लिहिलं होतं. जे पाहून तुम्हाला हसु आवरणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉर्म भरणे हे अवघड काम आहे. त्यात विद्यार्थांसाठी तर यामधील शब्द समजणे देखील कठीण आहे. फॉर्म भरताना आपल्यापैकी जवळ-जवळ सर्वांनीच काहीतरी चुका केल्या आहेत. त्यात नाव चुकीचं लिहिणं स्पेलिंगमध्ये गडबड करणं हे सगळं तर सहाजिकच आहे.


पण या विद्यार्थाची चुक पाहून तुम्हाला त्यावर हसावं की, रडावं हे कळणार नाही.



या फर्ममध्ये जिथे मोबाईनंबर विचारला होता, तेथे या मुलाने आपल्या मोबाईलचा चक्कं मॉडल नंबर टाकला 'आयफोन 6 प्लस'. होय, या मुलाने फॉर्म भरताना इतकी मोठी चुक केली, ज्यामुळे त्याचा फॉर्म स्वीकारला देखील गेला नाही.


सोशल मीडीयावर हा फोटो व्हायरल होताच लोक देखील त्याच्या कृत्याला वेगवेगळ्या प्रकारे जज करु लागले आहेत. काहींचं असं देखील म्हणणं आहे की कदाचित iphone आहे, हे दाखवण्यासाठी या तरुणाने असं केलं असावं. तर काहींना खरंच त्या मुलाला भाषा कळत नसावी असा अनुमान लावला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.