अमेरिकेपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र बनवणार उत्तर कोरिया
उत्तर कोरियाने सोमवारी इशारा दिला की, आपण अमेरिकेपर्यंत मारा करू शकणारे क्षेपणास्त्र निर्माण करणार आहोत. या क्षेपणास्त्राची निर्मीत या वर्षाखेरीपर्यंत पूर्ण होईल असेही उत्तर कोरियाने म्हटले आहे.
सोल : उत्तर कोरियाने सोमवारी इशारा दिला की, आपण अमेरिकेपर्यंत मारा करू शकणारे क्षेपणास्त्र निर्माण करणार आहोत. या क्षेपणास्त्राची निर्मीत या वर्षाखेरीपर्यंत पूर्ण होईल असेही उत्तर कोरियाने म्हटले आहे.
उत्तर कोरियाच्या सरकारी गुप्तचर संस्थेने सोमवारी ही माहिती दिली. ही मोहीम फत्ते करण्यासाठी उत्तर कोरिया सर्व ताकतीनिशी प्रयत्न करत असल्याचेही या संस्थेने म्हटले आहे. उत्तर कोरिया- अमेरिका यांच्यातील ताण दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. त्यामुळे जग अनेकदा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.
चीननेही केली जगाचा वेध घेणाऱ्या क्षपणस्त्राची निर्मिती..
दरम्यान, सीमाविस्तार हा प्रमुख अजेंडा डोळ्यासमोर ठऊन काम करणाऱ्या चीनने आता जगातील सर्वाधिक लांब मारा करणारे क्षेपणास्त्र बनविण्याचा घाट घातला आहे. या क्षेपणास्त्रामुळे अवघे जग चीनच्या टप्प्यात येणार आहे.
पुढील वर्षी हे क्षेपणास्त्र चीनच्या लष्करात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये सोमवारी (20 नोव्हेंबर) प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार हे क्षेपणास्त्र जगभरातील कोणत्याही ठिकाणाचा अचूक वेध घेऊ शकते. डोंगफेंग-41 नावाचे हे क्षेपणास्त्र शत्रूच्या क्षेपणास्त्र आणि बचाव यंत्रणेलाही टक्कर देऊ शकते. या क्षेपणास्त्राची गती मिसाईल स्पीड मॅक 10 (आवाजाच्या गतीपेक्षाही 10 पटीने अधिक, सुमारे 12,900 किलोमिटर प्रती तास) पेक्षाही अधिक आहे.