नॉर्थ कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या बहिणीची क्रुरता वाढतच आहे. तिच्या क्रुरतेच्या घटना भाऊ किमच्या घटनांसमोरही फिक्या पडत आहे. अमेरिकेला खुलेआम धमकी देणाऱ्या किम यो जोंगने आपल्या देशात सत्तेच्या विरोधात आवाज उचलणाऱ्यांवर अत्यंत क्रुर अत्याचार केले आहेत.  आता त्याच्या बहिणीनेदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशी शिक्षा दिली आहे की, संपूर्ण देश दहशतमध्ये आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हुकूमशाहची बहिण किम यो जोंगने अनेक सरकारी एजंन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गोळ्यांनी चाळणी केली आहे. संपूर्ण देशातील जनतेच्या चर्चांमध्ये हीच गोष्ट आहे. प्योंगयांगमध्ये मारले गेलेल्या या अधिकाऱ्याची ओळख होऊ शकलेली नाही. परंतु अधिकाऱ्यांनी सांगितले की किमच्या बहिणीच्या सांगण्यावरून अधिकाऱ्याला गोळी मारण्यात आली आहे. 


गेल्यावर्षीदेखील कत्तली


सूत्रांच्या मते, गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये किम यो जोंगने असाच क्रुर आदेश दिला होता. सोने तस्करीची बातमी सेंट्रल पार्टीला दिली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या 10 अधिकाऱ्यांना गोळ्या घालून मारून टाकन्यात आले होते. काही लोकांना आयुष्यभरासाठी तुरूंगात टाकन्यात आले आहे.


गद्दारीचे सूर दाबन्याचा प्रयत्न


किम यो जोंग उनची पार्टी सत्तेला आव्हान देणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती काढण्यात व्यस्त आहे. सत्तेच्या विरोधात बोलणाऱे किंवा आव्हान देणाऱ्यांच्या कत्तली करण्यात येत आहेत.