वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय दबाव आणि अमेरिकेसह संयुक्त राष्ट्राकडून दिले जाणारे इशारे धुडकाऊन लावत उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. उत्तर कोरियाच्या कार्यक्रमामुळे जगभरात नाराजी निर्माण झाली असतानाच उत्तर कोरियाने अमेरिकेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जग पुन्हा एकदा अण्वस्त्रयुद्धाच्या तोंडावर येऊन ठेपले आहे.


दोन्ही देश आक्रमक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अमेरिका जगाच्या वतीने उत्तर कोरियाला इशारा देत आहे की, उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्र कार्यक्रम थांबावावा. पण, अमेरिका आपल्यावरच नव्हे तर, जगावर दादागिरी करत असल्याचा पलटवार करत उत्तर कोरियाने वारंवार अमेरिकेच्या इशाऱ्याला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे अमेरिका संतापला आहे. तर, प्रत्येकवेळी अमेरिका उत्तर कोरियाची कोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून उत्तर कोरियाही चांगलाच संतापला आहे. त्यामुळे दोन्ही देश आक्रमक झाल्याचे चित्र नर्माण झाले आहे.


परिणामी युद्धच केले जाईल


दरम्यान, कोरियाई सुद्रात अमेरिकेची B-1B ही बॉम्बवाहू विमाने युद्धाभ्यास करताना नजरेस पडत आहेत. नेमक्या याच कारणामुळे उत्तर कोरिया अधिक संतापला आहे. त्यामुळे उत्तर कोरियाने म्हटले आहे की, या युद्धाभ्यासाचा परिणाम अमेरिका आणि उत्तर कोरिया अशा दोन्ही देशांना भोगावा लागेल. हे दोन्ही देश जगाला अण्वस्त्रयुद्धाकडे ढकलत आहेत. या पुढे अमेरिकेने जर उत्तर कोरियाविरूद्ध छेड काढल्यास आम्ही स्वस्त बसणार नाही. परिणामी युद्धच केले जाईल असा, निर्वानिचा इशार उत्तर कोरियाने अमेरिकेला दिला आहे.


अमेरिकेपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र बनवणार उत्तर कोरिया


दरम्यान, उत्तर कोरियाने यापूर्वीच इशारा दिला आहे की, आपण अमेरिकेपर्यंत मारा करू शकणारे क्षेपणास्त्र निर्माण करणार आहोत. या क्षेपणास्त्राची निर्मीत या वर्षाखेरीपर्यंत पूर्ण होईल असेही उत्तर कोरियाने म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी गुप्तचर संस्थेने ही माहिती जाहीर केली आहे.तसेच, ही मोहीम फत्ते करण्यासाठी उत्तर कोरिया सर्व ताकतीनिशी प्रयत्न करत असल्याचेही या संस्थेने म्हटले आहे. उत्तर कोरिया- अमेरिका यांच्यातील ताण दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. त्यामुळे जग अनेकदा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.