Trending News: के. ड्रामा भारतातही खूप लोकप्रिय आहे. जगभरात केड्रामा आणि के पॉपचे चाहते आहेत. मात्र याच के ड्रामामुळं 16 वर्षांच्या मुलांना 12 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. तर, अनेकांनी या शिक्षेवर विरोध दर्शवत संताप व्यक्त केला आहे. उत्तर कोरियातील ही घटना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर कोरियातील हिटलरशाहीबद्दल तर सगळेच जाणून आहेत. संपूर्ण उत्तर कोरियात हुकुमशाह किम जॉग यांची दहशत आहे. त्याच्याबद्दल अनेकदा काही विचित्र गोष्टी कानावर पडत असतात. अलीकडेच उत्तर कोरियातील दोन टीनएजर मुलांना टीव्ही सीरियल पाहण्याची भयंकर शिक्षा मिळाली आहे. दक्षिण कोरियाचा के ड्रामा पाहणे आणि शेअर करणे महागात पडले आहे. 


16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांपर्यंत सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. बीबीसीने शेअर केलेल्या एका व्हिडिओत, करड्या रंगाची वर्दी घातलेले दोन मुलं शेकडो लोकांनी घेरलेल्या एका मंचावर उभे असलेले दिसत आहेत. तिथे त्यांना शिक्षा सुनावण्यात येत आहे. 


दरम्यान,  2020मध्ये हर्मिट किंगडमद्वारे जारी करण्यात आलेल्या कायद्यानुसार उत्तर कोरियात टिव्हीवरील कार्यक्रमांसह सर्व प्रकारच्या मनोरंजन कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच दक्षिण कोरियातून प्रसारित होणाऱ्या मनोरंजनाचे कार्यक्रम शेअर केल्यास मृत्यूदंडाची शिक्षादेखील होऊ शकते. मात्र, तरीही काहीजण शेजारी देशातील चित्रपट किंवा सीरीज पाहण्यासाठी जीव धोक्यात घालतात. 


मुलांना शिक्षा सुनावताना म्हटलं आहे की, दक्षिण कोरियाची संस्कृती किशोरवयीन मुलांमध्ये पसरत जात आहे. ते सध्या 16 वर्षांचे आहेत. मात्र त्यांनी त्यांचे भविष्य बर्बाद केले आहे. या दोन्ही किशोरवयीन मुलांसाठी ही एक विनाशकारी शिक्षा आहे. मात्र, त्यांना सुदैवाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली नाहीये. 


उत्तर कोरियातील एका व्यक्तीने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, धक्कादायक म्हणजे, येथील नागरिक अमेरिकन सीरियल पाहताना पकडले गेले तर थोडीफार लाच देऊन त्यांना सोडून देण्यात येते. मात्र, दक्षिण कोरियन कार्यक्रम पाहिल्यास त्यांचे परिणाम फार भयंकर होतात. तुम्हाला गोळी मारुन ठारदेखील केले जाते. उत्तर कोरियातील लोकांसाठी दक्षिण कोरियातील ड्रामा एक ड्रग्सप्रमाणे आहेत. 


दरम्यान, दक्षिण कोरियातील कार्यक्रम किंवा दक्षिण कोरयाच्या सरकारमधील एखादा कार्यक्रम हे उत्तर कोरियातील प्रशासनासाठी एक मोठा धोका मानला जातो. याच कारणामुळं दहशत निर्माण करण्यासाठी लोकांना अशा प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात. उत्तर कोरियात असं दाखवण्यात आलं आहे की दक्षिण कोरियात खूपच हालाखीची परिस्थिती जगत आहेत. मात्र जेव्हा लोक दक्षिण कोरियातील नाटक किंवा चित्रपट पाहतात तेव्हा हे चित्र पूर्णपणे उलटे दिसते.