सौदी अरेबियातील (Saudi Arabia) एका व्यक्तीने 43 वर्षांत 53 वेळा विवाह करण्याचा 'विक्रम' केला आहे. इतक्यांदा विवाह करण्याचं कारणही या व्यक्तीनं दिलं आहे. मात्र या व्यक्तीने दिलेलं कारण वाचून नक्कीच तुम्हालाही धक्का बसेल. 63 वर्षीय अबू अब्दुल्ला यांना ‘शतकातील बहुपत्नीवादी’ (Polygamist Of The Century) म्हटले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शांततेच्या शोधात विवाह केल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. या व्यक्तीचा दावा आहे की त्याने वैयक्तिक आनंद नव्हे तर 'स्थिरता' आणि मन:शांती मिळवण्याच्या उद्देशाने 53 वेळा विवाह केला आहे. 


"मी दीर्घ कालावधीत 53 महिलांशी विवाह केला. पहिला विवाह केले तेव्हा मी 20 वर्षांचा होतो आणि ती (पत्नी) माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी होती," अब्दुल्ला सौदीच्या मालकीच्या टेलिव्हिजन MBC ला सांगितले.


"जेव्हा मी पहिल्यांदा विवाह केला, तेव्हा एकापेक्षा जास्त महिलांशी विवाह करण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. कारण तेव्हा मला सर्व स्थिर वाटले आणि मला मुले झाली."  मात्र, काही वर्षांनी नात्यात अडचणी निर्माण झाल्या आणि अब्दुल्ला यांनी वयाच्या 23 व्या वर्षी पुन्हा विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला आपला निर्णय सांगितला. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीमध्ये वाद झाला तेव्हा अब्दुल्ला यांनी तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा विवाह करण्याचा निर्णय घेतला. नंतर त्यांनी आपल्या पहिल्या दोन पत्नींना घटस्फोट दिला.


अब्दुल्ला म्हणाले की, त्यांच्या अनेक विवाहांचे साधे कारण म्हणजे त्याला आनंदी ठेवणारी स्त्री शोधणे होते. अब्दुल्ला म्हणाले की, त्यांनी आपल्या सर्व पत्नींशी प्रामाणिक राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.


सर्वात कमी काळ विवाह हा फक्त एक रात्र टिकला. 63 वर्षीय अब्दुल्ला यांनी बहुतांश सौदी महिलांशी विवाह केले असले तरी, त्यांनी परदेशातील व्यावसायिक प्रवासादरम्यान विदेशी महिलांशी विवाह केल्याचे मान्य केले आहे.


अब्दुल्ला म्हणाले की, "जगातील प्रत्येक पुरुषाला एक स्त्री हवी असते आणि ती नेहमी तिच्यासोबत असावी असं वाटतं. स्थिरता ही तरुणीसोबत नाही तर वृद्ध स्त्रीसोबत असते." अब्दुल्ला यांनी आता एका महिलेशी लग्न केले आहे आणि पुन्हा विवाह करण्याचा कोणताही विचार नाही, असं म्हटलं आहे.