मुंबई : तंत्रज्ञानामुळे आज अनेक समस्या सोडवल्या गेल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने अनेक अवघड गोष्टी सोप्या झाल्या आहेत. तंत्रज्ञान प्रत्येक क्षणाला बदलत आहे. आज बाजारात आपली वस्तू विकण्यासाठी कंपन्या नव्या नव्या गोष्टी आणून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. वृत्तपत्रापासून ते टीव्ही, सिनेमा, होर्डींग्ज, सोशल मीडिया अशा अनेक ठिकाणी आता जाहिरात पाहायला मिळते. पण आता या जाहिरात आकाशात पाहायला मिळणार आहेत. रूसच्या एका स्टार्टअपने आकाशात जाहिरात करण्याची तयारी केली आहे. यामुळे आता आकाशात बिलबोर्ड्स लावले जाणार आहेत. त्यानंतर चंद्र आणि ताऱ्यांप्रमाणे हे बिलबोर्ड्स आकाशात चमकणार आहेत. यामुळे एकाचवेळी लाखो लोकं ते पाहू शकतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार्टअप स्टार्टरॉकेट (StartRocket) चे सीईओ व्लॅड सिटनिकोव यांनी म्हटलं आहे की, सॅटेलाईटच्या माध्यमातून पाठवलेले डिस्को बॉल प्रोग्राममुळे ते प्रभावित झाले आणि त्यांनी स्पेस एडवरटाइजिंगची प्लान तयार केला. मागच्या वर्षी कॅलिफोर्नियाच्या रॉकेट लॅबने डिस्को बॉलला आकाशात पाठवलं होतं. याला ऑर्बिटिंग आर्ट प्रोजेक्टच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलं होतं.



स्पेस बिलबोर्ड्स हे छोट्या छोट्या सॅटेलाईटच्या माध्यमातून तयार केले जातील. रॉकेटच्या मदतीने ते सॅटेलाईटप्रमाणे आकाशात सोडले जातील. त्यानंतर त्याला लोअर ऑर्बिटमध्ये स्थिर केलं जाईल. त्यानंतर आकाशात याचं दर्शन होणार आहे.


कंपनीच्या या योजनेवर जगभरातील अनेक वैज्ञानिकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आकाशात ट्रॅफिक वाढणं चांगलं नाही. यामुळे सॅटेलाइट्स एकमेकांना धडकतील. याशिवाय अशा प्रोजेक्ट्समुळे आकाशात कचरा वाढेल. ऑर्बिटमध्ये याआधीच खूप कचरा आहे. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेंसच्या मते, पृथ्वीच्या चारही बाजुंना ऑर्बिटमध्ये जवळपास 5 लाख कचरा पसरला आहे.