मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की, सर्वसामान्यांपासून ते सगळ्याच वर्गावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. सरकारने आता पेट्रोल आणि डिझेलचे पैसे कमी केले असले तरी देखील, ते पुरेसे नाही. इंधनाच्या या वाढत्या किंमतीमुळे फक्त प्रवास करणंच महागलं नाही तर यामुळे भाजी-पाल्याचे भाव देखील वाढले आहेत. म्हणूनच बऱ्याच देशांमध्ये यावर पर्यायासाठी संशोधन सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल आणि डिझेलला पर्याय केवळ भारतातच नाही, तर अमेरिकेसह इतर देशही शोधत आहेत आणि या दिशेने काम करत आहेत. या एपिसोडमध्ये, एक पर्याय समोर आला आहे. तो म्हणजे लोकांची लघवी.


हे तुम्हाला ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी देखील हे खरं आहे. अमेरिकेतील एका कंपनीने पेट्रोल आणि डिजेलला पर्याय म्हणून लघवीवर चालणारे ट्रॅक्टर तयार केले आहे.


वास्तविक, अमेरिकन कंपनी अमोगीने अमोनियावर चालणारा ट्रॅक्टर तयार केला आहे. तसे पाहाता आपल्या मूत्रात अमोनिया मुबलक प्रमाणात आढळतो. म्हणजेच लघवी ट्रॅक्टरमध्ये टाकुन ट्रॅक्टर चालणे शक्य आहे.


आता कंपनीला हा पर्याय कसा सुचला? हे जाणून घेऊ या



वास्तविक, कंपनीने असा रिएक्‍टर बनवला, तो अमोनियाला तोडतो आणि त्यातून ऊर्जा निर्माण करण्यासाठी हायड्रोजनचा वापर केला करतो. म्हणजेच, हे स्पष्ट आहे की, आपण ट्रॅक्टर किंवा इतर कोणत्याही वाहनाच्या टाकीत लघवी टाकली तर ते चालू होणार नाही, परंतु यावर प्रक्रिया करुन ते इंधनासाठी वापरण्या योग्य होईल.


डीडब्ल्यूने आपल्या अहवालात सांगितले आहे की, लघवीचे अमोनियामध्ये रूपांतर करता येते, त्यातून ऊर्जा निर्माण करता येते. कंपनीने सध्या ट्रॅक्टरसह हा प्रयोग केला आहे, परंतु भविष्यात यावर सागरी मालवाहू जहाजे चालवायची असल्याचा कंपनीचा प्लान आहे.


अनेक दशकांपासून उद्योगात अमोनियाचा वापर केला जात असल्याने, त्याच्या साठवणुकीसाठी आधीच पुरेशी व्यवस्था आहे. त्याच्या हाताळणी आणि वितरणासाठी साधने आधीच उपलब्ध आहेत. अमोनिया कार्बन डाय ऑक्साईड सोडत नसल्यामुळे आणि भरपूर ऊर्जा असल्याने, कार्बनमुक्त वाहतुकीसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.