नवी दिल्ली : सौदी अरबच्या एका नव्या कायद्यामुळे इथं राहणारे भारतीय त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सौदी अरबमध्ये राहणारे भारतीय आपल्या कुटुंबासहीत मायदेशात परतत आहेत... किंवा आपल्या कुटुंबीयांना भारतात धाडत आहेत. सौदी अरबमध्ये तेलाची कमाई कमालीची घटलीय. त्यामुळे, याची भरपाई प्रवाशांकडून वसूल करण्याचा निर्णय स्थानिक सरकारनं घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौदी सरकार यापूर्वीही प्रवाशांकडून कर वसूल करत होतं. परंतु, यापूर्वी संपूर्ण कुटुंबाला एकदाच कर भरावा लागत होता. जुलै २०१८ पर्यंत हा टॅक्स १०० रियाल प्रती व्यक्ती प्रती  महिना आहे. परंतु, यानंत मात्र हा प्रत्येक व्यक्तीमागे २०० रियाल होणार आहे. म्हणजेच, जुलैपासून चार सदस्य असलेल्या एका प्रवासी कुटुंबाला प्रत्येक वर्षाला ९६०० रियाल 'रेसिडेन्स टॅक्स' म्हणून भरावा लागणार आहे. भारतीय चलनानुसार ही कर तब्बल १.७२ लाख रुपये होतो. इतकच नाही तर हा टॅक्स २०२० पर्यंत ४०० रियाल प्रती व्यक्ती प्रती महिना करण्याची योजनाही विचाराधीन आहे. 


सौदीमध्ये सध्या जवळपास ३२.५ लाख भारतीय काम करत आहेत. यामध्ये केरळच्या लोकांची संख्या सर्वाधिक म्हणजे जवळपास ४० टक्के आहे. त्यानंतर तेलंगणा, महाराष्ट्र, यूपी आणि राजस्थानचा क्रमांक लागतो.