मुंबई : रुग्णालयात डॉक्टरांनंतर सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे रुग्णालयात असणाऱ्या नर्सची. रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक कोणतीही समस्या असली तरी, नर्सला सांगतात. पण याठिकाणी तर नर्सनेच माणुसकीला काळीमा फासला आहे. चक्क मृतदेहासोबत नर्सने असं कृत्य केलं. ज्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. या नर्सने रुग्णांच्या खात्यातून कोट्यवधी रुपये काढून घेतले आहे. या सर्ल गोष्टींचा खुलासा झाल्यानंतर नर्सला तरुंगात डांबण्यात आलं आहे. जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Thethaiger च्या रिपोर्टनुसार, सतांग थोंग्रामफान (Satang Thongramphan) असं 46 वर्षीय नर्सचं नाव आहे. सतांगवर मृत व्यक्तीच्या मुलाने गंभीर आरोप केले आहे.  सतांगने 3 कोटी 44 लाख रुपये ऑनलाइन बँकिंगद्वारे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले. रुपये ऑनलाइन बँकिंगद्वारे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप नर्सवर करण्यात आला आहे. 


पतिवत थायसोम (Patiwat Thaisom) असं मृत व्यक्तीच्या मुलाचं नाव आहे. पतिवतच्या तक्रारीनंतर नर्सला अटक करण्यात आली आहे. पतिवतचे वडील बँकेत कार्यरत होते. त्यांनी कर्करोगाच्या या गंभीर आजाराच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


तक्रारीनंतर पोलीस (Police) नर्सच्या घरी चौकशीसाठी गेले असता पोलीसही अवाक् झाले. तपासादरम्यान पोलिसांना 50 लाख रुपये रोख, सोने आणि एक कार सापडली. याशिवाय त्याच्या घरातून 6 बँक पासबुक सापडले. 


चौकशीत रुग्णाचा मोबाईल चोरला नसल्याचे नर्सने सांगितले. परंतु रुग्णाने त्यांना हे काम करण्यास सांगितले असल्याचे नर्सने सांगितले. माळालेल्या माहितीनुसार,  नर्सने रुग्णाच्या बँक अॅपवरून (Bank Frau) 17 व्यवहार केले आणि 2 कोटींहून अधिकचे पेमेंट ट्रान्सफर केले.