मुंबई : एकीकडे महागाई तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात बेरोजगार वाढत आहे. आता थेट एका कंपनीने हजार कर्मचारी काढण्याचा निर्णय घेतला आहे. रोज लोकांना कामावर किंवा घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणाऱ्या ओला कंपनीच्या हजार कर्मचाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओलाने अचानक खर्च आणि कर्मचाऱ्यांचा कपातीबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. एकीकडे बंपर भर्ती करणाऱ्या ओला कंपनीने आता हजार कर्मचारी कामावरून काढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा मार्केटमध्ये सुरू आहे. 


इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार कंपनी सुरुवातीला 400-500 कर्मचाऱ्यांना काढण्याच्या तयारीत होती. आता ही संख्या वाढून हजारवर पोहोचण्याची शक्यता आहे. कंपनीचा पूर्ण भर सध्या खर्चात कपात करण्यावर आहे. 


ओला कंपनी आता ई-मोबिलिटीवर पूर्ण लक्ष देत आहे आणि त्यामुळेच सातत्याने भरती केली जात होती. ओलाने यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या परदेशी बाजारपेठांमधील गुंतवणुकीतून सध्या ब्रेक घेतला आहे. 


ओला आपली बिझनेस स्ट्रॅटजी बदलण्याच्या विचारात आहे. आता त्यांचा फोकस इलेक्ट्रिक वाहनांवर असणार आहे. त्यामुळे मोबिलिटीतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार कंपनी करत आहे. व्यवसायातील बदलत्या स्ट्रॅटेजीचा कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 


दुसरीकडे कंपनीतून काढण्याच्या भीतीमुळे कर्मचारी स्वत: कंपनी सोडत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओला कंपनी पुन्हा 800 च्या आसपास नवे उमेदवार भरण्याच्या तयारीत आहे.