ऑकलंड : पिझ्झा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. एकवेळ घरचं जेवण नको पण पिझ्झा खाऊया असं सहज म्हणून प्लॅन केला जातो. काही जणांना पिझ्झा म्हणजे जीव की प्राण असल्यासारखं वाटतं. आवडीनं पिझ्झा खाणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिझ्झा मागवताय? थांब! यांना पिझ्झामध्ये जे मिळालं ते पाहून तुम्ही कधीही तो मागवणार नाही. तुमची खाण्याचीही इच्छा निघून जाईल असा एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. 


एका व्यक्तीनं प्रसिद्ध ब्रॅण्डचा पिझ्झा मोठ्या आवडीनं ऑर्डर केला. पिझ्झा आल्यावर उत्साहाने तो खायला जाणार तेवढ्यात त्याला जे दिसलं ते पाहून त्याची खाण्याची इच्छाच मेली. त्याने घडलेला संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने मागवलेल्या पिझ्झामध्ये जिवंत आळ्या सापडल्या.


या अळ्या पिझ्झामध्ये फिरताना दिसत होत्या. हे फक्त एक दोन अळ्या नव्हत्या तर खूप अळ्या एकत्र होत्या. न्यूझीलंड हेराल्ड वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार ऑकलंड, न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रसिद्ध ब्रँड पिझ्झामध्ये अळ्या सापडल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.


 


हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला पिझ्झा खायचीही इच्छा होणार नाही. अत्यंत किळसवाणा प्रकार घडल्याचं त्याने सांगितलं. त्या व्यक्तीने सांगितले की त्याने स्वतःसाठी पिझ्झा ऑर्डर केला होता. पिझ्झा घरी आल्यावर त्याने तो खाण्यासाठी उघडला त्यावेळी त्यामध्ये अळ्या फिरत होत्या.