पृथ्वीवर सापडली एलियनची सिक्रेट वस्तू; संशोधक अचंबित
ब्रिटनमध्ये एक रहस्यमयी वस्ती सापडली आहे. या वस्तूचे कनेक्शन थेट एलियनशी जोडण्यात आले आहे.
Alien News Steel Monolith : एलियनच्या अस्तित्वाबाबत अनेक दावे केले जात आहेत. एलियन पृथ्वीवरील मानवाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर एलियन हे पृथ्वीवर लक्ष ठेवून असल्याचाही दावा केला जात आहे. अशातच पृथ्वीवर एक रहस्यमयी वस्तू सापडली आहे. या वस्तूचा थेट एलियनशी संबध जोडण्यात आला आहे. पृथ्वीवर सापडलेली ही वस्तु एलियनची सिक्रेट वस्तू असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही वस्तू पाहून संशोधकही अचंबित झाले आहेत.
ब्रिटनमधील वेल्समधील एका टेकडीवर अत्यंत विचित्र आणि रहस्यमयी वस्तू सापडली आहे. या वस्तुला Steel Monolith असे म्हणतात. Steel Monolith हा 10 फूट उंचीचा स्टीलचा खांब आहे. Steel Monolith दिसल्यानंतर अचानक काही दिवसांनी ते गायब होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अगदी रहस्यमयी पद्धतीने हे Steel Monolith गायब होतात असं संशोधकांचे म्हणणे आहे. सोशल मिडियावर Steel Monolith चे फोटो व्हायरल होत आहेत. ही वस्तू नेमकी काय आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
यापूर्वीही दिसली होती अशी रहस्यमयी वस्तू
Steel Monolith सारखी रहस्यमयी वस्तू यापूर्वी देखील दिसली होती. 2020 मध्ये, यूके आणि अमेरिकेत अशा प्रकारचे Steel Monolith दिसल्याच्या बातम्यांमुळे खळबळ उडाली होती. Steel Monolith प्रथम यूटा, अमेरिकेत दिसले. यानंतर, रोमानिया, फ्रान्स, पोलंड, यूके आणि नंतर कोलंबियामध्ये मोनोलिथ दिसल्याच्या बातम्या आल्या होत्या. यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये दक्षिण पूर्वी तुर्कीमध्ये एक असाच 10 फूट लांबीचा धताुपासून बनलेला खांब दिसला होता. हा खांब देखील काही दिवसात रहस्यमयीरित्या गायब झाला होता. Steel Monolith नेमके काय आहेत. Steel Monolith अचानक गायब कसे होतात. याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. Steel Monolith याचा संबध थेट एलियनशी जोडण्यात आला असून ही वस्तू एलियनची असल्याचा दावा केला जात आहे. UFO अर्थात Unidentified flying object याच्या संबधीत देखील अनेक दावे केले जातात. UFO आकाशात उंच उडताना दिसून येतात त्यानंतर ते अचानक रहस्यमयरीत्या गायब होतात.