लग्नातील त्या फोटोनं उघडले नवऱ्याचे डोळे... बायकोचा असा चेहरा पाहाताच एकटीला सोडून परतला नवरदेव
नवऱ्यासमोर आपल्या पत्नीबद्दल असं काही समजलं, ज्यामुळे तो आपला हनीमून मधेच सोडून पुन्हा आपल्या घरी निघून आला.
मुंबई : लग्न हा प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. यानंतर त्या दोघांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. तसेच लग्नानंतर बरेच लोक हनीमुनला जातात. येथे नवरा-बायको दोघांनाही एकत्र वेळ घालवण्यासाठी मिळतो. तसेच यामुळे त्यांना एकमेकांचा स्वभाव ओळखण्यासाठी देखील मदत होते. परंतु याच वेळी त्यांच्यामध्ये गैरसमज झाला किंवा जोडीदाराचा असा चेहरा समोर आला जो समोरच्याला पटणारा नसेल, तर मात्र हे नातं फार काळ टिकणं शक्य होत नाही.
असं एक प्रकरण सध्या समोर आलं आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. खरंतर एक कपल हनिमूनला गेलं होतं. तेव्हा नवऱ्यासमोर आपल्या पत्नीबद्दल असं काही समजलं, ज्यामुळे तो आपला हनीमून मधेच सोडून पुन्हा आपल्या घरी निघून आला.
खरंतर ही संपूर्ण घटना त्या नवऱ्यानं स्वत: सोशल मीडियावर शेअर केली. ज्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या व्यक्तीने आपली कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने सांगितले की, लग्न होईपर्यंत सर्व काही ठीक होते. पण ज्या दिवशी तो पत्नीसोबत हनिमूनला गेला होता, त्याच दिवशी त्याने लग्नाचा अल्बम पाहण्याची इच्छा व्यक्त केली. लग्नाचा अल्बम पाहिल्यानंतर मात्र त्याचा मूड बिघडला.
त्या व्यक्तीने सांगितले की, त्याच्या बायकोने लग्नाच्या फोटोंमधून त्याच्या मुलाला क्रॉप केले होते. हे पाहून त्याला राग आला. सुरुवातीला त्याला वाटले की, हे फोटोग्राफरचे कृत्य आहे. मात्र जेव्हा त्याने बायकोला याबाबत विचारले तेव्हा बायकोने सांगितले की, मला फक्त चित्रातील वधू-वरांनाच पाहायचे आहे. म्हणूनच त्याने फोटोवरून मुलाला क्रॉप करून वेगळे केले.
बायकोने फोटो काढले
'द सन'च्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीला आधीच 12 वर्षांचा मुलगा होता आणि त्याने नुकतेच दुसरे लग्न केले. त्यांचा मुलगाही या लग्नात सहभागी झाला होता. त्या माणसाची नवीन बायको आणि मुलासोबतची अनेक फोटो काढले होते.
पण हनिमूनचे फोटो पाहिल्यावर अनेक फोटोंमधून त्यांचा मुलगा गायब होता. जेव्हा नवऱ्याने त्याच्या बायकोला याबद्दल विचारले तेव्हा तिने हे मान्य केली की, तिनेच हे कृत्य केलं आहे.
बायकोने सांगितले की, तिला असे काही फोटो हवे आहेत, ज्यामध्ये ती फक्त तिच्या नवऱ्यासोबत असावी. मात्र, तिच्या या उत्तरांचा तिच्या नवऱ्यावर काहीही परिणाम झाला नाही, शेवटी तो ही हनीमुन सोडून घरी परत आला. पुढे त्यांच्या नात्याचं काय झालं, याबाबत या व्यक्तीने काहीही माहिती देलेली नाही.