मुंबई : जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन केलं जात आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागला. या महामारीत हॉटेल व्यवसायीकांना देखील मोफा फटका बसला आहे. या महामारीच्या परिस्थितीत असंख्य लोक गरजूंच्या मदतीसाठी धावून आले. पण काही लोक असे असतात जे गुपितपणे मदत करण्यावर विश्वास ठेवतात. अशीच एक बातमी न्यू हॅम्पशायरमधून. एका व्यक्तीने 2 हजार 700 रूपयांचं जेवण ऑर्डर केलं आणि टिप म्हणून तब्बल 11 लाख रूपये दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढी मोठी रक्कम टिप म्हणून मिळ्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. न्यू हॅम्पशायर येथील हॉटेलचे मालक स्टंबल्स इन बार एँड ग्रिल यांनी सोमवारी फेसबुकवर बिलचा एक फोटो शेअर केला. त्यांनी फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'रेस्टॉरंटमध्ये उदार मनाचा एक व्यक्ती आला होता. आम्ही तुमच्या  उदारतेबद्दल  आदर व्यक्त करतो.'


आपण बीलमध्ये पाहू शकतो,  हॉटेलमध्ये आलेल्या व्यक्तीने 2 हजार 700 रूपयांचं जेवण ऑर्डर केलं आणि 16 हजार डॉलर म्हणजेचं जवळपास 11 लाख रूपयांपेक्षा जास्त रक्कम टिप म्हणून दिली. रेस्टॉरंटचे मालक म्हणाले, 'सुरवातीला आम्हाला वाटलं त्याच्याकडून चुकून झालं असेल. पण त्या व्यक्तीसोबत बोल्ल्यानंतर लक्षात आलं की त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसाठी टिप म्हणून 11 लाख रूपये दिले.'


त्या ग्राहकाने दिलेले पैसे 8 कर्मचाऱ्यांना वाटण्यात आले. तर महामारीत अशा रितीने मदत करणाऱ्या व्यक्तीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. सांगायचं झालं तर लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसायांना मोठा धक्का बसला. पण आता सर्व गोष्टी हळू-हळू पूर्व पदावर येत आहेत.