One plane out of every house in a Village in America : हल्ली सर्वांकडेच बाईक किंवा कार असते. घराबाहेर कार आणि बाईक पार्क केलेल्या आपण पाहतो. पण, जगात एक असे गाव आहे  जिथं घराबाहेर विमानं पार्क केलेली असतात. या गावातील लोक कामाला विमानाने जातात. इतकचं नाही तर इथले लोक बाजारातही विमान घेऊनच जातात. जाणून घेऊया हे ओनोखे गाव कुठे आहे. 


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे घराबाहेर पार्क केलेल्या असतात होड्या; पाण्यात दडलेलं कोकणातील छुपं बेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे अनोखे गाव अमेरिकेत आहे. अमेरिकेच्या रेसिडेन्शियल एअरपार्क या गावात सर्वांकडे स्वत:चे विमान आहे. या भागातील प्रत्येक घराकडे स्वतःचे असे विमान आहे(One plane out of every house in a Village in America).
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेत निर्णायक भूमिका बजावली होती. 1939 पर्यंत अमेरिकेत  34,000 वैमानिक होते. पण 1946 पर्यंत हा आकडा वाढून 4 लाखांपेक्षाही अधिक झाला होता. महायुद्ध संपल्यावर अनेक धावपट्टय़ा मोकळ्या झाल्या आणि वैमानिकांना काम उरले नाही.


असा परिस्थितीत या धावपट्ट्यांचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला. यामुळेच अमेरिकेच्या द सिव्हिल एअरोनॉटिक्स ऍडमिनिस्ट्रेशनने या धावपट्टीच्या परिसरात एअरपार्क निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला, यांतर्गत बंद पडलेल्या धावपट्टय़ांच्या क्षेत्रात निवृत्त सैन्य वैमानिकांना वसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


अशा वस्त्यांना ‘फ्लाय-इन-कम्युनिटीज म्हटले जाते. येथील प्रत्येक घरात कारप्रमाणेच एक विमान असते. या वस्त्यांमधील रस्ते देखील तशाच प्रकारे निर्माण करण्यात आले आहेत. एक विमान आणि कार परस्परांना न धडकता एकमेकांना ओलांडू शकतील इतक्या रुंद आकाराचे रस्ते येथे निर्णाण करण्यात आले.  जगात 630 पेक्षा अधिक आवासीय एअरपार्क्स असून यातील 610 पेक्षा अधिक अमेरिकेत आहेत. कॅलिफोर्निया येथील कॅमेरून पार्क विमानतळ याच आवासीय एअरपार्क्सपैकी आहे.


या अनोख्या रेसिडेन्शियल एअरपार्क गावाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतात.  प्रत्येक घराच्या गॅरेजमध्ये कारऐवजी एक विमान उभे असल्याचे व्हिडिओत पहायला मिळते. कॅलिफोर्नियाच्या प्रेस्नो येथील सिरेरा पार्क पहिला एअर पार्क होता, ज्याची निर्मिती 1946 मध्ये करण्यात आली होती.