Fraud in the Name Of Love: ऑनलाईन डेटिंगमध्ये (Onling Dating) फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर येत असता. काही वेळा ऑनलाईन डेटिंग यशस्वी होतं, तर काही वेळा मिळतो तो फक्त धोका. असाच एक धक्कादायक प्रकार एका तरुणीबरोबर घडला आहे. डेटिंग अॅपवर (Dating App) चॅटिंग करता करता त्या तरुणीचा एका तरुणावर जीव जडला. पण डोळे झाकून केलेल्या या प्रेमाचा मोठा मोबदला या तरुणीला चुकवावा लागला. त्या तरुणाने तिच्या खात्यातून चक्क 70 लाख गायब केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेटिंग अॅपवर झाली ओळख
ही घटना अमेरिकेत घडली आहे. महिलेचं नाव क्रिस्टीन आहे, डेटिंग अॅपवर क्रिस्टिनची ओळख एका नायजेरियन तरुणाशी झाली. डेटिंग अॅपवर त्याने आपली ओळख मार्क गॉडफ्रे अशी सांगितली होती. क्रिस्टिन आणि मार्क यांच्यात डेटिंग अॅपवर चॅट सुरु झालं. बोलता बोलता दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. क्रिस्टिन मार्कच्या प्रेमात आकंठ बुडाली. 


नायजेरियन तरुणाने जाळ्यात ओढलं
क्रिस्टिनने नायजेरियन तरुण मार्क गॉडफ्रेचा प्रोफाईल बघून प्रभावित झाली आणि त्याच्याशी मैत्री करण्या प्रस्ताव पाठवला. मार्कनेही लगेच तो प्रस्ताव स्विकारला. दोघांचे बोलणं सुरु झालं. इतकंच नाही तर पहिल्या डेटचा प्लानही सुरु केला. चॅटिंग दरम्यान मोठ मोठी आमिष दाखवून मार्कने क्रिस्टिनला जाळ्यात ओढलं होतं, आणि क्रिस्टिनने त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकला होता. पण मार्कच्या डोक्यात मात्र दुसरंच काही सुरु होतं.


मार्कने असं फसवलं क्रिस्टिनला
मार्कने क्रिस्टिनला आपण आर्किटेक्ट इंजिनिअर असून ग्रीसला नोकरी करत असल्याचं सांगितलं. दोघांनी भेटायचं ठरवलं, त्यामुळे क्रिस्टिन खुश होती. पण भेटीच्या आधी मार्कने तिला आपली बहिण आजारी असून पैशांची गरज असल्याचं तिला सांगितलं. क्रिस्टिनने कोणताही विचार न करता आपले बँक डिटेल्स मार्कला दिले. इथेच क्रिस्टिन फसली. मार्कने तिच्या बँक खात्यातून तब्बल 70 लाख रुपये लंपास केले. आपल्या बँक खात्यातून पैसे गेल्याचं कळल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं क्रिस्टिनचा लक्षात आलं. याप्रकरणी तीने आता सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.