नवी दिल्ली : घरकाम करण्यात बहुतांश महिला पुढे असल्याचे दिसून आले आहे. मात्र घरकाम करणाऱ्या पुरुषांबाबत एक वेगळेच संशोधन पुढे आले आहे. नोत्र डॅम विद्यापीठाने हे संशोधन केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरकाम करणाऱ्या महिलांबाबत अनेक साहित्य लिहले गेले आहे. परंतु घरकामात मदत करणाऱ्या पुरुषांबाबत फारच कमी लिहलं गेलंय. परंतु नोत्र डॅम विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासात घरकामात मदत करणारे पुरुष जास्त आर्थिक कमाई करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याप्रमाणात घरकामात मदत करणाऱ्या पुरुषांची कमाई मात्र कमी असल्याचे पुढे सांगण्यात आले आहे.


प्रत्येक पत्नीच्या आपल्या नवऱ्याकडून घरकामात मदत करण्याबाबत अपेक्षा असतात. तरीही सहमत न होणारे अथवा काहीही न मान्य करणारे पुरुष फार कमी मदत करतात किंवा करीतच नाहीत. परंतु हेच पुरुष घरकामात मदत करण्याचा वेळ कमाईसाठी खर्च करून जास्त पैसा कमावतात. असे या संशोधनात म्हटले आहे. 


मानसशास्त्रात मानवातील महत्वाच्या पाच गुणांपैकी 'सहमती' हा एक महत्वाचा गुण मानला गेला आहे. प्रेमळ, दयाळू, सहानुभूती वाळगणारा आणि सहकार्य करणारा असे निकष त्यात येतात. त्यातच सहमत न होणारे असाही एक प्रकार आहे. अशी मानसे वरील गुणांच्या कोणत्याच निकषात बसत नाहीत. अशी मानसे स्वतःपूरता पाहणारी तसेच स्पर्धा करणारी असतात. 


विद्यापीठाने दोन अभ्यास केले होते. त्यात सहमत न होणारे लोक सहमत होणाऱ्या लोकांपेक्षा अधिक पैसे कमावतात. त्यांची कमाई जास्त असण्याचे कारण ते  घरकामात मदत करीत नाही. सहमत न होणारी लोकं नोकरी कामधंद्याकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे त्यांची कमाई अधिक असते.


स्वतःपूरता विचार करणारे पुरुष विवाहित असले नसले तरी, ते जास्तच कमाई करतात असा दावा देखील या अभ्यासात करण्यात आला आहे.