Optical Illusion: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे ऑप्टिकल इल्यूजन हे व्हायरल होतान दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होताना दिसते. सध्या असंच एक चित्र व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये एक मुलगी दिसते आहे. जिचं फक्त अर्ध शरीरचं दिसतं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांचा हा फोटो पाहून एकच गोंधळ उडाला आहे. हा फोटो पाहून लोकांना असंही वाटतं आहे की ही मुलगी जमिनीत अडकली आहे. त्यामुळे सध्या या फोटोमागील नक्की प्रकरण काय आहे? याबद्दल लोकांनाही अनेक प्रश्न पडले आहेत. या फोटोकडे पाहून तुम्हाला अनेक नानाविध तर्क काढावे लागतील. परंतु तुमची नजर जर का अगदी अचूक असेल तर तुम्हाला हा फोटोतील गंमत कळायला फारसा वेळही लागणार नाही. तेव्हा चला तर मग पाहुया की, नक्की या फोटोमागील गंमत आहे तरी काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक फोटो हे आपल्या मनात एक आभास निर्माण करत असतात. तेव्हा अशावेळी आपल्यालाही या काही गोष्टींमुळे एकाच चित्रात किंवा फोटोमध्ये भलतेच काहीतरी दिसते. परंतु आपल्याला त्यातूनही त्या फोटोतलं वास्तव किंवा त्या चित्रातील वास्तव काय आहे हे कळायला मात्र फार वेळ लागतो. त्यामुळे आपण सगळेच विचार करत बसतो की या फोटोतील नक्की खरं कारणं आहे तरी काय. चला तर मग जाणून घेऊया अशाच एका व्हायरल होणाऱ्या फोटोबद्दल. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी या फोटोत दिसते आहे. ती आपल्या हाताशी काहीतरी पकडून आहे. या फोटोत तिच्या शरीरावरचाच अर्धाच भाग फक्त आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न की या मुलीचे अर्धे शरीर नक्की कुठे आहे जमीनीखाली? 


हा फोटो सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. हा फोटो दोन वर्षांपुर्वीचा असला तरीसुद्धा हा सध्या चर्चेत आला आहे त्यामुळे त्याची बरीच चर्चा रंगली आहे. @TimKietzmann नावाच्या एका युझरनं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलंय की या फोटोसाठी त्यानं कुठलाही फोटोशॉप वापरलेला नाही तर हा अगदी खरा फोटो आहे असं तो म्हणतो आहे. त्यामुळे त्याच्या या फोटोखाली अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की या फोटोमागील सत्य आहे तरी काय 



ही मुलगी खरंतर एका कड्याला टेकून आहे. जो कडा एका बाजूला आहे आणि तिच्या पायाखाली जमीन आहे. त्यामुळे तिचा अर्धा शरीराचा भाग दिसतो आहे. जमीनीचा रंग आणि कड्याचा भाग एकाच रंगाचा आहे आणि ती मुलगी टेकून उभी असल्यानं असं वाटतंय की तिचा अर्धा शरीराचा भाग हा आतमध्ये आहे. जमीन आणि कडा समान पातळीवर आणि समान रंगावर असल्यानं ती मुलगी आता जमिनीत अडकली आहे का असं वाटतं आहे.