Optical Illusion : `या` व्यक्तीच्या चित्रात लपल्यात तीन मुली, 30 सेकंदाच शोधून दाखवा
99 टक्के लोकांना `या` फोटोत 3 मुली सापडल्या नाही, तुम्हाला सापडतायत का पाहा?
Optical Illusion Trending : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 30 सेकंदाचा अवधी आहे. (optical illusion Find three girls hidden in this person picture within 30 seconds nz)
3 मुली शोधून काढा
ऑप्टिकल इल्यूजन सोडवल्याने मेंदू आणि डोळ्यांनाही चांगली कसरत होते. आता असेच एक रहस्याने भरलेले चित्र समोर आले आहे. हे चित्र एका वृद्ध व्यक्तीचे आहे आणि त्यांच्या तीन मुलीही या चित्रात आहेत. तुम्हाला त्या चित्रातील 3 मुली शोधून काढायच्या आहेत.
तिसरा चेहरा शोधणे फार कठीण'
ज्यांचे मन कुशाग्र आहे आणि स्वतःला खूप मजबूत समजतात त्यांनाही खूप प्रयत्नांनंतर मुलींचे दोन चेहरे सापडतात. पण तिसरा चेहरा शोधणे फार कठीण जाईल. तुम्हालाही तुमच्या मेंदूची आणि डोळ्यांची चाचणी घ्यायची असेल, तर 30 सेकंदात चित्रात लपलेले मुलींचे तीनही चेहरे शोधा.
हे ही वाचा - Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले 13 प्राणी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
येथे खाली वृद्ध माणसाचे चित्र पहा
तुम्हाला या चित्रात लपलेले 3 चेहरे शोधायचे आहेत आणि हे चेहरे शोधण्यासाठी तुमच्याजवळ फक्त 30 सेकंदाचा वेळ आहे. जर तुम्ही काळजीपूर्वक या चित्राकडे पाहिल्यास तुम्हाला त्यात 3 लपलेले चेहरे सापडतील. इतकं करुनही जर तुम्हाला चेहरा सापडत नसेल तर तुम्हाला आम्ही योग्य उत्तरासहीत एक फोटो शेअर करतो. जेणेकरुन तुम्हाला त्या चित्रात लपलेले 3 चेहरे शोधायला वेळ मिळेल. खरे तर तीन मुलींचे चेहरे शोधण्यासाठी फोटो डावीकडे आणि उजवीकडे फिरवावा लागेल.
येथे परिणाम पहा
म्हातार्याच्या चित्रात तिन्ही मुली कुठे लपल्या आहेत ते तुम्ही पाहिले आहे का? वास्तविक हे चित्र अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की, त्यात लपलेले चेहरे शोधणे प्रत्येकाला सोपे नाही. ही अशी कोडं आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम मानली जातात. यामुळे फावल्या वेळेत आपले मनोरंजन ही होते.