Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले 13 प्राणी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

99 टक्के लोकांना 'हे' 13 प्राणी सापडले नाही, तुम्हाला सापडतात का पाहा?  

Updated: Nov 20, 2022, 09:58 AM IST
Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले 13 प्राणी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ  title=
optical illusion you have 30 seconds to find 13 animals hidden in this photo nz

Optical Illusion Viral : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 30 सेकंदाचा अवधी आहे. (optical illusion you have 30 seconds to find 13 animals hidden in this photo nz)

तुम्हाला या चित्रात 13 प्राणी शोधायचे आहेत, जर तुम्ही हे काम केले असेल तर तुमचाही हुशार लोकांच्या यादीत समावेश होईल. पण हे करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 30 सेकंद आहेत.

ऑप्टिकल इल्युजन असलेली ही छायाचित्रे आजकाल सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत, हे पहिले सोडवणे प्रत्येकाच्या क्षमतेत नाही. या चित्रात 13 प्राणी आहेत, परंतु फार कमी लोक ते शोधू शकतात. हा असा मनाचा खेळ आहे जो प्रत्येकजण हाताळू शकत नाही.

अशा मेंदूचा व्यायाम ज्यामध्ये तुम्हाला मजा येईल आणि कदाचित तुम्हाला रागही येईल. पण धीर सोडू नका. काळजीपूर्वक पहा. सुरुवातीला तुम्हाला 5 किंवा 7 प्राणी दिसतात पण प्रत्यक्षात चित्रात 13 प्राणी आहेत.

हे ही वाचा - Optical Illusion: फोटोत नवऱ्याची अंगठी हरवली, 30 सेकंदात शोधून दाखवा

पहिल्या दृष्टीक्षेपात तुम्हाला हत्ती (Elephent), गाढव (Donky), कुत्रा (Dog), मांजर (Cat) आणि उंदीर (Mouse) यांचे चित्र प्रथम दिसेल. पण खरा खेळ यातच आहे, कारण अजून 8 प्राणी बाकी आहेत.चला हत्तीच्या सोंडेपासून सुरुवात करूया, येथे तुम्हाला डॉल्फिन (Dolphin), पक्ष्याचे डोके आणि मगरी दिसतील. तुम्हाला हत्तीच्या डोळ्याच्या जागी मासा, शेपटीच्या जागी साप आणि पायांमध्ये कोळंबी दिसली का? 

जर तुम्ही डोळ्याच्या पातळीवर लक्षपूर्वक पाहिले तर तुम्हाला कासव आणि गाढवाच्या वर एक डास दिसेल. जर तुम्हाला या फोटोमधील प्राणी शोधायला त्रास होत असल्यास आम्ही तुम्हाला खाली फोटो देत आहोत जेणेकरुन तुम्हाला हे कोडं (Puzzle) सोडवणे सोपे जाईल.

 

ही अशी कोडं आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम मानली जातात. यामुळे फावल्या वेळेत आपले मनोंगजन ही होते.