Optical Illusion :  सोशल मीडियावर कन्फ्यूज करणारे अनेक फोटो व्हायरल झालेली आपण पाहिली आहेत. हे फोटो पाहून आपल्या डोक्याचं दही होतं. या फोटोमध्ये काही गोष्टी लपलेल्या असतात. त्या शोधण्यात अनेकांना आवडतं. पण या Optical Illusion वाले फोटो वाटतात तेवढे सोपे नसतात. 99 टक्के लोकं या गोष्टी शोधण्यास अपयशी होतात. आजही आम्ही तुमच्यासाठी भन्नाट फोटो आणला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोमध्ये अनेक पक्षी आहेत. या पक्ष्यांच्या थव्यात तुम्हाला फळ शोधायचं आहे. तर या पक्ष्यांच्या थव्यात तुम्हाला एक नाही दोन नाही तर 4 किवीची फळं शोधायची आहेत. पक्ष्यांचा रंग आणि किवीचा रंग एकच असल्याने या थव्यामध्ये ते शोधणं अनेकांना अवघड जात आहे. विशेष म्हणजे ही फळं तुम्हाला 15-20 सेकंदात शोधायची आहेत. चला बघू कोणाकोणाला किवी शोधता येतो ते. 


 


हा फोटो हंगरीचे आर्टिस्ट ग्रेगरी डकास यांनी तयार केला आहे. या आर्टिस्टला Dudolf  या नावाने पण ओळखलं जातं. त्यांनी हा फोटो फेसबुक अकाउंटवर शेअर केला असून त्यांनी यूजर्सला किवी शोधण्याचे चँलेज दिलं आहे.  फेसबुकवर त्यांनी चँलेज केल्यावर यूजर्सकडून किवी शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले. अनके यूजर्सने कमेंट करून सांगितलं आहे की, त्यांना 3 किवी तर सहज मिळाले पण चौथा किवी शोधण्यासाठी खूप वेळ लागला. जर तुम्हाला पण चौथा किवी दिसत नाही आहे. तर चला पाहूयात चौथा किवी कुठे लपला आहे ते. 



हंगेरियन ऑर्टिस्ट ग्रेगरी हे रंबीबेरंगी ब्रेन टीझर्ससाठी जगात प्रसिद्ध आहेत. त्यांचे रंबीबेरंगी ब्रेन टीझर्स पाहून आपलं डोकं गरगरतं.