NASA Bennu Earth Collision: पृथ्वीवरील प्रलय, पृथ्वीचा नाश यासंदर्भात अनेकदा चर्चा होताना दिसते. पृथ्वीच्या विनाशाबद्दल अनेकदा वेगवेगळे अंदाज बांधले जातात. मात्र आता वैज्ञानिकांनी खरोखरच एक धक्कादायक इशारा दिला आहे. हा इशारा पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती येऊ शकते याकडे लक्ष वेधत आहे. अंतराळातील एक छोटा लघुग्रह (किंवा उल्का) अत्यंत वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. या लघुग्रहामध्ये तब्बल 22 अणूबॉम्ब इतकी शक्ती आहे. हा लघुग्रह पृथ्वीला धडकला तर विनाश होईल असं सांगितलं जात आहे. वैज्ञानिकांनी अगदी तारखेसहीत या लघुग्रहासंदर्भातील माहिती दिली आहे. 


22 अणूबॉम्बची ताकद असेल एवढी ऊर्जा पडेल बाहेर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मेट्रो' वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बेन्नू नावाचा हा लघुग्रह आपल्या पृथ्वीच्या दिशेने येत आहे. खरं तर तो दर 6 वर्षांनी पृथ्वीच्या जवळून जातो. मात्र ही फारशी चिंतेची गोष्ट नाही. मात्र त्याच्या परिक्रमेच्या मार्गात होणारा बदल पाहून असं सांगितलं जात आहे की एके दिवशी हा लघुग्रह थेट पृथ्वीला धडक देऊ शकतो. हा लघुग्रह पृथ्वीला धडकला तर पृथ्वीवर एक भल्या मोठ्या आकाराचं छिद्रं पडू शकतं. आता जपानमधील हिरोशिमा, नागासाकी येथे 2 अणूबॉम्ब टाकले त्यावेळेस एवढा विशान झाला होता. त्यावरुनच पृथ्वीवर एकाच वेळी 22 अणूबॉम्बची ताकद असलेला हा लघुग्रह आदळला तर पृथ्वीवर महाविनाश होईल. 1945 हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या लिटिल बॉय हा अणूबॉम् 0.015 मेगाटन टीएनटी ऊर्जा उत्सर्जित झाली होती. मात्र हा 'बेन्नू' नावाचा लघुग्रह पृथ्वीवर धडकल्यास 1200 मेगाटन टीएनटी इतकी ऊर्जा उत्सर्जित होईल. हिरोशिमाच्या अणुबॉम्ब विस्फोटापेक्षा ही ऊर्जा 100 पटीने अधिक असेल.


यान धडकलं


अमेरिकी अंतराळ संस्था 'नासा'च्या ओरायसिस- आरईएक्स या अंतराळ यानाने 20 ऑक्टोबर 2020 रोजी या लघुग्रहाला धडक देऊ एक नमुना कलेक्ट केला होता. 2 वर्षांच्या अभ्यासनंतर 'नासा'च्या टीमने केवळ 10 सेंटीमीटर प्रति सेकंदाच्या वेगाने हे यान धडकल्याने एक मोठा खड्डा तयार झाला. अनेक डोंगरांएवढा दगडांचा ढिगारा बाहेर फेकला गेला अन् 8 मीटर रुंद खड्डा पडला. यामधून एवढी ऊर्जा निघाली की यानावरील काही उपकरणंही बंद पडली. सुदैवाने ही मोहीम केवळ 30 सेकंद सुरु होती आणि त्यामुळेच हे यान सुरक्षित राहिलं. ही धडक कशी झाला खालील व्हिडीओ पाहा...



कधी धडकणार हा लघुग्रह तारखीही झाली जाहीर


संशोधकांनी केलेल्या आकडेमोडीनुसार हा लघुग्रह आजपासून 159 वर्षांनी पृथ्वीला धडक देईल. 24 सप्टेंबर 2182 रोजी हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळू नये म्हणून त्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न 'नासा' करत आहे. पृथ्वी 4.5 अब्ज वर्षांपासून अतित्वात आहे. मात्र आतापर्यंत केवळ 190 लघुग्रह पृथ्वीला धडकले आहेत. यापैकी 3 वेळा या लघुग्रहांचा आकार एवढा मोठा होता की मोठा विनाश यामुळे झाला होता. डायनॉसॉरचा विनाशही अशाच एका लघुग्रहामुळे झालेला.