कोरोना प्रादुर्भावात न्यूयॉर्कची आयडीया, ९० हजार नोकऱ्या वाचल्या
न्यूयॉर्कमध्ये आऊटडोअर डायनिंगची व्यवस्था करण्याचा निर्णय
न्यूयॉर्क : जगभरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये न्यूयॉर्कने एक चांगली कल्पना राबवली आहे. जिचे जगभरातून कौतूक होतंय. कोरोना वायरसमुळे बराच काळ बंद असलेले रेस्टॉरंट, हॉटेल, बार आता खुले झाले आहेत. अशात न्यूयॉर्कमध्ये आऊटडोअर डायनिंगची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
अशा व्यवस्थेमुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास मदत होऊ शकते. रेस्टॉरंटच्या बाहेर खुल्या जागेत आऊटडोअर डायनिंगची व्यवस्था देखील असेल असे महापौर बिल डी ब्लासियो यांनी सांगितले.
रेस्टॉरंट खुली करण्याच्या निर्णयामुळे ९० हजार नोकऱ्या वाचल्या. जुनमध्ये या कार्यास सुरुवात झाली. जनतेला हे आवडू लागलं आहे. रेस्टॉरंट खुली करणं म्हणजे महत्वाच्या इंडस्ट्रीला सहाय्य झालंय. हे एक धाडसी पाऊल होते पण आम्ही यात यशस्वी झाल्याचे महापौरांनी सांगितले.
न्यूयॉर्क शहराला जगातील सुरु राहणारं शहर बनवण्यास आणि विस्तार करण्याचा आम्हाला अभिमान असल्याचे ते म्हणाले.
फुटपाथचा उपयोग
रस्त्याच्या बाजुची जागा गाडी पार्क करण्यासाठी न करता नागरिकांना बसण्यासाठी तसेच लघु उद्योजकांना वापरण्याची परवानगी देण्यात आलीय असे न्यूयॉर्क शहराचे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ ओपन स्ट्रीट्सचे अध्यक्ष जेम्स पेट्चेट यांनी सांगितले. न्यूयॉर्क शहर अधिक फिरण्यायोग्य, तंदुरुस्थ बनत चाललं आहे. पण हे करत असताना अनेक आव्हानही येतील असेही ते म्हणाले.