लंडन : इंग्रजी ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या बाजारात आलेल्या नव्या आवृत्तीमध्ये मराठी शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यात खास करुन वापरण्यात येणाऱ्या बोली भाषेतील शब्दांचा समावेश करण्यात आलाय. डिक्शनरीत जुग्गाड, चमचा अन् दादागिरी या शब्दांना स्थान देण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय भाषेतील अनेकदा वापरलेले शब्द ऑक्सफर्डच्या इंग्लिश डिक्शनरीच्या नव्या आवृत्ती समाविष्ट करण्यात आले आहेत. काही खाद्य पदार्थांचाही समावेश करण्यात आलाय. भेंडी, गुलाब जामुन, खिमा, मिर्च, मिर्च मसाला, नमकिन आणि वडा हे शब्द  सप्टेंबर २०१७ च्या अद्ययावत आवृत्तीत समाविष्ट करण्यात आलेत.


तसेच ‘अण्णा’,‘अब्बा’,‘बापू’,‘दादागिरी’,‘अच्छा’आणि ‘सूर्य नमस्‍कार’ यांसारख्या भारतातील ७० शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मराठी, हिंदी, उर्दू, तेलुगू, तामिळ आणि गुजराती या भाषेतील शब्दांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.


achcha abba anna bada bada din
bas bapu bhindi bhavan chaudhuri
chamcha chakka jam chacha chup didi
devi desh dadagiri dum diya
funda haat gully gulab jamun gosht
jai kund keema jugaad ji
ji jhuggi mirch mirch masala mata
nivas natak namkeen nai nagar
qila sevak surya namaskar tappa vada

 


याव्यतिरिक्त ‘अच्छा’,‘दादा’,‘बडा दिन’,‘बच्चा’,‘चना डाळ’, ‘सूर्य नमस्कार’ यांसारख्या भारतीय शब्दही या डिक्शनरीत त्याच्या अर्थांसह समाविष्ठ करण्यात आले आहेत.टाईमपास, फंडा, अच्छा, नाटक आणि चिप यासारख्या शब्दांचा आता शब्दकोशात त्यांच्या अर्थासह समाविष्ट करण्यात आले आहेत.


नातेसंबध, अन्नपदार्थ आणि संस्कृतीशी संबंधित जास्तीत जास्त भारतीय शब्दांचा या डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. या प्रामुख्याने गुलाम जामूनचा शब्द आहे.