नवी दिल्ली : coronavirus कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग आणि त्यामुळं संक्रमित होणाऱ्यांची झपाट्यानं वाढणारी संख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. पण, बहुतांश देशांमधाल काही भागांत मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याची बाबही नाकारता येत नाही. त्यातच आता Covid 19 Vaccine  कोरोनावरील लस संशोधन प्रक्रियेला वेग आल्यामुळं अतिशय सकारात्मक असे परिणाम समोर येऊ लागले आहेत. सोमवारी विश्वविख्यात Oxfords university ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडूनही याबाबतची सकारात्मक बातमी समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कित्येक महिन्यांपासून कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठीची लस शोधण्यासाठी म्हणून संशोधकांनी कसोशीनं प्रयत्न केले होते. अखेर ऑक्सफर्डच्या या प्रयत्नाना यश आलं असून, या लसीच्या चाचणीचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. त्याबाबतचाच एक व्हिडिओ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला. 


जानेवारी महितन्यापासूनच ऑक्सफर्डमधील संशोधक कोरोनासाठीच्या लसीच्या संशोधन प्रक्रियेवर काम करत होते. सध्या ते या लसीच्या मानवी चाचणीच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्याव पोहोचले आहेत. Lancet, Phase 1 results मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार लसीमुळं कोणत्याही प्रकारची इजा होत नाही आहे किंवा तिचे विपरीत परिणाम होत नाही आहेत. शिवाय या लसीमुळं मानवी शरीरात उत्तम रोगप्रतिकारक शक्तीची निर्मिती होत आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये ही लोगप्रतिकारक शक्ती कोविडविरोधात संरक्षणात्मक ठरते का, हे पाहिलं जाणार आहे. शिवाय कोणकोणत्या वयोगटातील व्यक्तींवर या लसीचा काय परिणाम होतो याचंही परीक्षण केलं जाणार आहे. सध्या या टप्प्याची सुरुवात झाली आहे. ज्यासाठी आम्ही हजारो स्वयंसेवकांचे आभार मानतो, अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आली. 



 


इतकंच नव्हे, तर कोरोनावरील या लसीच्या निर्मितीसाठी जागतिक स्तरावर AstraZeneca कडून उत्पादन करण्यात येत असल्याचंही ऑक्सफर्डकडून सांगण्यात आलं. त्यामुळं आता चाचणीचे सर्व टप्पे ओलांडल्यानंतर ऑक्सफर्डची ही लस कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी फायद्याची ठरेल अशी आशाही व्यक्त करण्यात आली. कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असतानाच त्यावर प्रतिबंधात्मक लसीच्या संशोधनामध्ये मिळालेलं हे यश नक्कीच दिलासादायक आणि तितकंच आशावादी आहे, असं म्हणायला हरकत नाही.