Oxygen in Earth: मनुष्य असो वा प्राणी, प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. मात्र, लवकरच पृथ्वीवरुन ऑक्सिजन संपणार आहे. संशोधकांचे जगाला चिंतेत टाकणारे संशोधन समोर आले आहे. या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामुळे सर्वांचीच झोप उडाली आहे. नेमकं काय आहे या अहवालात जाणून घेवूया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वीवर सर्वत्र ऑक्सिजन आहे. यामुळेच पृथ्वीवर सजीवाचे अस्तित्व टिकून आहे. ऑक्सिजन हा प्राणवायू आहे. पृथ्वीच्या वातावरणाचा 21 टक्के भागात ऑक्सिजन निर्माण होतो.  जवळपास 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा आपला ग्रह तयार झाला तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि पाण्याची वाफ यांचे आवरण होते.  भविष्यात पृथ्वीवरील वातावरणात ऑक्सिजन असलेल्या वातावरणात बदल होवून हळू हळू ऑक्सिजनचे अस्तित्व नष्ट होईल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.  


हा बदलामुळे पृथ्वी सुमारे 2.4 अब्ज वर्षांपूर्वी ग्रेट ऑक्सिडेशन इव्हेंट (GOE) म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्थितीत जाईल.  असे देखील अभ्यासात म्हटले आहे. हे संशोधन पुन्हा चर्चेत आले आहे. शास्त्रज्ञ सौरमालेच्या बाहेर राहण्यायोग्य ग्रहांचा शोध घेत आहेत.  वातावरणातील ऑक्सिजन गायब होईल.


जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संशोधन 


जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे ख्रिस रेनहार्ट यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. न्यू सायंटिस्टला त्यांनी या अहवालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीच्या वातावरमातील ऑक्सिजनची घट खूप गंभीर आहे.  आजच्या तुलनेत वातारवरणातील  ऑक्सिजनचे प्रमाण दहा लाख पट कमी होईल. डूम्सडे ची भविष्यवाणी करणार्‍या शास्त्रज्ञांनी संशोधनात याबाबत भाष्य केले आहे.  मॉडेल्स वातावरणाच्या डीऑक्सीजनेशनचा अंदाज वर्तवतात. वातावरणातील O2 वेगाने आर्चियन लक्षणीय पातळीपर्यंत घसरते, शक्यतो पृथ्वीवर आर्द्र हरितगृह परिस्थिती निर्माण होईल. 


संशोधकांनी पृथ्वीच्या वातावरणाचे तपशीलवार मॉडेल तयार केले आहे. ज्यामध्ये सूर्याची चमक आणि कार्बन डाय ऑक्साईडच्या पातळीतील घट यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. कमी कार्बन डायऑक्साइड म्हणजे वनस्पतींसारखे कमी प्रकाशसंश्लेषण करणारे जीव, ज्यामुळे ऑक्सिजन कमी होईल असे हे निरीक्षण आहे.