नवी दिल्ली : भारतीय वैमानिक अभिनंदनच्या मिग २१ ने ज्या एफ १६ ला पाडले त्या विमानाचा वैमानिक विंग कमांडर शाहउद्दीन हा पॅरेशूटच्या सहाय्याने पाकिस्तानात उतरला. परंतू पाकिस्तान ग्रामस्तांनी त्या वैमानिकाला भारतीय वैमानिक समजून जबर मारहाण केली. या मारहाणीत पाकिस्तानी विंग कमांडर शाहउद्दीन मृत्यूमुखी पडला आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत दोन विमानांनी एकमेकांना टक्कर दिली होती. त्यामध्ये भारतीय वैमानिक अभिनंदन सुखरुप त्यांच्या मायदेशी परतले आहेत. पण वैमनिक शाहउद्दीन हा भारतीय असल्याचा दावा पाकिस्तान कडून करण्यात आला होता. आता सूत्रांनी सांगितल्यानुसार हा वैमानिक पाकिस्तानचाच असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्याच लोकांनी त्यांच्या वैमानिकाला मारले असल्याचे सिद्ध झाले आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवादविरूद्ध लढा देण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला एफ 16 विमान पुरवले होते. पण अमेरिकेने या विमानाचा भारताविरूद्ध वापर करण्यास पाकिस्तानवर निर्बंध लादले होते. पाकिस्तानने हे विमान भारताविरूद्ध वापरल्याचा ठोस पुरावा झालेल्या पत्रकार परिषदेत सादर केला. भारताकडे रडार फुटप्रिंट असल्याचेही जाहीर केले. पण पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावत विमान वापरला नसल्याचा दावा केला आहे.


भारताने केलेल्या कारवाईमुळे चिडलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. मात्र, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची एफ १६ विमाने पिटाळून लावली. त्याचवेळी भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले. हे मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. शूक्रवारी रात्री  भारतीय वैमानिक अभिनंदन भारतात दाखल झाले.