Pakistan Earthquake : तुर्की आणि त्यामागोमागच मोरोक्को झालेल्या भूकंपातून हे देश आणि संपूर्ण जग अद्यापही सावरलेलं नाही. त्यातच आता संकटाची आणखी एक चाहूल मिळाल्यामुळं भारतातही काहीशी भीती पाहायला मिळत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे पाकिस्तानाच देण्यात आलेला न भूतो न भविष्यती अशा भूकंपाचा इशारा. सध्याच्या घडीला शेजारी राष्ट्रात एका संशोधकानं केलेल्या भविष्यवाणीमुळं कमालीचं भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. नेदरलँड्समधील एका संशोधन संस्थेकडून पाकिस्तानात पुढील 48 तासांमध्ये महाविनाशकारी भूकंप येणार असल्याचा इशारा देण्यात आल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलर सिस्टम ज्योमेट्री सर्वे (एसएसजीईओएस)तील एका संशोधकानं दावा केल्यानुसार पाकिस्तान आणि त्यानजीक सुरु असणाऱ्या भूगर्भातील हालचाली पाहता ही स्थिती एका मोठ्या भूकंपाच्या दिशेकडे जाणारी असून, त्यामुळं त्सुनामीचाही धोका संभवतो. 


कोणी केली ही भयावह भविष्यवाणी? 


तिथं हजारोंच्या संख्येनं फॉलोअर्स असणाऱ्या एका अधिकृत अकाऊंटवरून हा इशारा देण्यात आला तर, कोणी फ्रँक हूगरबीट्स या ज्येष्ठ डच संशोधकाचा हवालाही दिला. याच संशोधकानं तुर्की आणि सीरियातील भूकंपाच्या पूर्वसूचना दिल्या होत्या. X वरही पाकिस्तानातील भूकंपाचा विषय ट्रेंड करू लागला. पाकिस्तानातून तर अनेकांनीच जागतिक संघटनांकडे मदतीची याचनाही केली. पण, हूगरबीट्सनं नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन केलं. 


हेसुद्धा वाचा : Asian Games : अरे, रूको जरा...सब्र करो...! सेंच्युरी पूर्ण होण्यापूर्वीच जयस्वालचं सेलिब्रेशन, असा का गोंधळला यशस्वी?



'आम्ही 30 सप्टेंबर रोजी या भागात काही भूगर्भीय हालचालींची नोंद केली. ज्यामध्ये पाकिस्तानसह त्यालगतच्या काही भागाचा समावेश होता. ही स्थिती येत्या काळात मोठ्या हादऱ्याची पूर्वसूचना देते', असं म्हणत त्यांनी मोरोक्कोच्या स्थितीशी सद्यस्थिती साधर्म्यात असल्याचंही स्पष्ट केलं. पण, त्यांनी भूकंप येईलच याबाबत मात्र ठाम मत दिलं नाही. 


पाकिस्तान प्रशासनाचं भलतंच म्हणणं... 


एकिकडून वैश्वित स्तरावर ज्यांचे अंदाज ग्राह्य धरले जातात अशा संस्था पाकिस्तानला सतर्क करत असतानाच तिथं पाकिस्तानातील राष्‍ट्रीय सुनामी केंद्र कराचीच्या संचालकपदी असणाऱ्या अमीर हैदर लघारी यांनी मात्र हे दावे फेटाळले आहेत. भूकंप कधी आणि केव्हा येईल याचा अचूक अंदाज वर्तवताच येत नाही. पाकिस्तानच्या यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन मुख्य टेक्टोनिक पदरांच्या सीमा पाकिस्तानला लागून पुढं जातात. त्यांच्या मते इथंच कुठंतरी भूकंप येऊ शकतो, पण त्याची भविष्यवाणी करणं मात्र कठीणच आहे. पाकिस्तान भारताचं शेजारी राष्ट्र असल्यामुळं तिथं भूकंप आल्यास भारतात त्याचे काय परिणाम होणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल.