Asian Games : अरे, रूको जरा...सब्र करो...! सेंच्युरी पूर्ण होण्यापूर्वीच जयस्वालचं सेलिब्रेशन, असा का गोंधळला यशस्वी?

Asian Games : टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळीमुळे संघाने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 202 रन्स केले. दरम्यान यावेळी सेंच्युरीच्या जवळ असताना यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal ) गोंधळलेला दिसला. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 3, 2023, 09:07 AM IST
Asian Games : अरे, रूको जरा...सब्र करो...! सेंच्युरी पूर्ण होण्यापूर्वीच जयस्वालचं सेलिब्रेशन, असा का गोंधळला यशस्वी? title=

Asian Games : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा ( Asian Games ) स्पर्धा 2023 च्या क्वार्टर फायनलच्या फेरीत टीम इंडिया विरूद्ध नेपाळ यांच्यात सामना आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रुतुराज गायकवाड याने टॉस जिंकून जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळीमुळे संघाने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 202 रन्स केले. दरम्यान यावेळी सेंच्युरीच्या जवळ असताना यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal ) गोंधळलेला दिसला. 

सेंच्युरी पूर्ण होण्यापूर्वीच केलं सेलिब्रेशन

नेपाळविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या ( Team India ) फलंदाजांनी नेपाळच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. या सामन्यात टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने तुफान फलंदाजी करत शतक ठोकलं. मात्र यावेळी शतक पूर्ण होत असताना जयस्वाल ( Yashasvi Jaiswal ) काहीसा गोंधळलेला दिसला. यावेळी 99 रन्सवरच त्याने शतक पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन केलं. 

नेमकं काय घडलं?

झालं असं की, 46 बॉल्समध्ये जयस्वाल ( Yashasvi Jaiswal ) 35 रन्सवर खेळत होता. यावेळी त्याने उंच शॉट खेळून बॉल बाऊंड्री पार घालवला. आपण मारलेला शॉट सिक्स होता, असं समजून जयस्वालने ( Yashasvi Jaiswal ) हेल्मेट आणि बॅट उंचावत सेंच्युरीचं सेलिब्रेशन केलं. मात्र रिप्लेमध्ये तो शॉट 4 गेल्याचं लक्षात आलं. म्हणजेच 95 वरून जयस्वाल 99 रन्सवर पोहोचला होता. त्यामुळे सेंच्युरीसाठी त्याला अजून एका रनची गरज होती. 

जयस्वालचं खणखणीत शतक

दरम्यान हा घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर जयस्वालनेही ( Yashasvi Jaiswal ) डोक्याला हात लावला. मात्र त्यानंतर त्याने 1 रन काढून स्वतःचं शतक पूर्ण केलं. जयस्वालने त्याच्या खेळीमध्ये 7 सिक्स आणि 8 फोर लगावलेत. मात्र सेंच्युरी पूर्ण झाल्यानंतर लगेच जयस्वालने त्याची विकेट गमावली.  

पहिल्याच सामन्यात जयस्वालने रचला इतिहास

एशियन गेम्सच्या या भारत विरुद्ध नेपाळ सामन्यात भारतीय युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने इतिहास रचलाय. जयस्वालने 48 बॉल्समध्ये पहिले टी-20 शतक झळकावलंय. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये भारतासाठी शतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने 49 बॉल्समध्ये 100 रन्सची तुफान खेळी खेळली. या कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय ठरलाय.

टीम इंडियाची प्लेईंग 11

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, आर साई किशोर, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग.