Viral : आपल्याकडे नावांच्या अनेक गमती जमती असतात. आपल्या मुलाबाळांची नावं कधी कोण काय ठेवले याचा काही नेम नाही. कधीकधी गंमत म्हणूनही आपल्या मुलांना जगावेगळी नावं दिली जातात. असे व्हिडीओज हे इन्टाग्रामवर कायमच व्हायरल होत असतात. त्यामुळे अशावेळी सोशल मीडियावर हास्याचा एक फवारा उडतो. सध्या अशाच एका व्हायरल बातमीनं (Viral News on Social Media) सगळीकडेच चर्चांना उधाण आलं आहे. आम्ही पण तुम्हाला अशाच एका हटके नावामागची गंमत सांगणार आहोत. परंतु ही गंमत समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या कहाणीमधली करेक्टर्स समजून घ्यावी लागतील. तिही अतिशय रंजक आहेत आणि त्यामागची गंमतही निराळी आहे. तुम्हीही वाचल्यानंतर तुम्हाला (India Boy Name Viral) आश्चर्याचा धक्का तर बसेलच परंतु तितकीच गंमतही वाटेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो सगळीकडेच ट्रेण्ड होतो आहे. याची चर्चा सध्या सगळीकडेच होते आहे. ही गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल परंतु त्यांनी हे सोशल मीडियावरून सगळीकडेच शेअर केले आहेत. हे एक कपल आहे ज्यांनी सोशल मीडिया आपली एक पोस्ट व्हायरल केली आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, ही तुमच्यासाठी एक चेतावनी आहे. कृपया आमच्यासारखं वागू नका. ज्या चुका इतर पालक करतात त्याच चुका आम्ही देखील केल्या आहेत. खरंतर ही चुक केल्यानं मोठी गंमत निर्माण झाली आहे. 


आमचा मुलगा इब्राहम हा लहान बाळ असल्यापासूनच माझ्या आणि माझ्या पत्नीच्या मध्ये झोपतो. लहानपणापासून आम्ही त्याला ही सवय लावली आहे. त्यामुळे आम्ही म्हटतो की जी चुक आम्ही केली तीच चुक इतर सर्व पालक करतातच करतात. माझी बायको ही बांग्लादेशी आणि मी पाकिस्तानी आहे. आमचा मुलगा हा आपल्या मध्ये झोपतो म्हणून आम्ही त्याचे नावं इंडिया असे ठेवले आहे. 


सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होते आहे. त्यामुळे लोकांनाही ही पोस्ट वाचून गंमत वाटते आहे. या पोस्टला आत्तापर्यंत 23 हजारांहून (Facebook Post) अधिक लाइक्स मिळाले आहेत. अनेक पालकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. पालकांच्या मध्ये झोपणं मुलांना सुरक्षित वाटतं असं एकानं म्हटलं आहे जे या कपलनंही त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे त्यामुळे मुलांना पालकांच्या मध्ये झोपायची सवय लागतेच.



तर एकानं म्हटलंय, की लहानपणीच मी आमच्या मुलीला स्वतंत्र बेडवर झोपण्याची सवय करण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते जमलं नाही. त्यांना पालकांसोबत झोपावसं वाटतं, यासाठी मुलांना दोष देऊ शकत नाही.