पाकिस्तानकडून सीझफायर, उरीमधल्या गोळीबारात एक महिला जखमी
पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे.
श्रीनगर : पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे.
पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी भारताच्या स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी उरी सेक्टरच्या नाम्बाला आणि बाज या भागात पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. भारतीय जवानांनीही पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं चोख उत्तर दिलंय.
या गोळीबारात हनिमा बेगम नावाची स्थानिक महिेला जखमी झालीय. सैन्य शिबिरात या महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं.
गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानकडून तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. १३ ऑगस्ट रोजीही जम्मू - काश्मीरच्या पुँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर भारतीय आणि पाकिस्तानी दलांत गोळीबार झाला होता. त्याअगोदर १२ ऑगस्ट रोजीही पाकिस्तानाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान नायक सुभेदार जगराम सिंह तोमर शहीद झाले तर एका महिलेचा मृत्यू झाला होता.